आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिश्श्यासाठी बहिणीही सरसावल्या, डीएमआयसीसाठी संपादित जमिनीचा मोबदला 900 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - डीएमआयसीसाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनीच्या मोबदला वाटपात हिस्सा मिळावा, म्हणून आता बहिणीही सरसावल्या आहेत. त्यामुळे बिडकीनसह पाच गावांतील 125 गटांचे भू-संपादन रखडण्याची शक्यता आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी शेंद्रा-बिडकीनदरम्यान तीन टप्प्यांत दहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसºया टप्प्यात बिडकीन, बन्नीतांडा, बंगलातांडा, निलजगाव, नांदलगाव परिसरातील 2,351 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. संपादित जमिनीचा मोबदला वाटपासाठी शासनाने 1,325 कोटी रुपये मंजूर केले असून आतापर्यंत उपविभागीय कार्यालयास 900 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत.
बिडकीन व निलजगाव येथील 194 गटांचे 133 कोटी 50 लाख रुपयांचे धनादेश पास फॉर पेमेंटसाठी जिल्हा कोशागार कार्यालयात दाखल करण्यात आलेले आहेत. सोमवारपासून या धनादेशांचे वाटप झाल्यानंतर बिडकीन व निलजगाव येथील मोबदला वाटपाचे काम पूर्ण होईल. कारण दुसºया टप्प्यात निलजगाव येथील 18 लाभार्थींचेच 13 गट संपादित करण्यात येणार आहेत. त्यानंतर बन्नीतांडा, बंगलातांडा, नांदलगाव येथील मोबदला वाटपाचे काम सुरू होईल.
भावाच्या विरोधात तक्रारी दाखल : बिडकीन येथील गट क्रमांक 285 मधील जमिनीच्या मोबदल्यात हिस्सा मिळावा म्हणून कमलबाई वसंतराव वराडे व इतर चार बहिणी, तर गट क्रमांक 290 मधील मोबदल्यात हिस्सा मिळावा म्हणून मंगलबाई कारभारी गोटे यांनी आपल्या भावांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. 285, 290, 327, 335, 368, 376 अशा 125 गटांमध्ये भावांच्या वाटण्या, बहिणीचे हिस्से, खरेदी-विक्रीचा वाद अशी प्रकरणे दाखल झालेली आहेत.

न्यायालयातही धाव
संमती मिळालेल्या जमिनीचे मोबदला वाटपाचे काम जरी सुरळीत सुरू असले, तरी प्रामुख्याने बिडकीन, बन्नीतांडा, बंगलातांडा येथील मोबदला वाटपात हिंदू वारसा कायद्याप्रमाणे हिस्सा म्हणून बहिणी, नातू, भाऊ यांनी 125 तक्रारी दाखल केलेल्या आहेत. काहींनी तर न्यायालयात दाद मागितली आहे. या तक्रारींचा लवकर निपटारा होऊन जमीन संपादनाचे काम सुकर व्हावे, म्हणून 125 प्रकरणांपैकी 26 प्रकरणांची 25 जून रोजी उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांच्यासमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे.

अपूर्ण संमतिपत्रके
बिडकीन येथील 60 गटांमध्ये एकत्र कुटुंबाची संयुक्त संपत्ती असल्याने अपूर्ण संमतिपत्रके मिळाली. त्यामुळे 185 प्रकरणांचा निपटरा झाल्याशिवाय भू-संपादन पूर्ण होणार नाही. तसेच 250 हेक्टर वर्ग 2 च्या सरकारी जमिनीचा निर्णय होताच मोबदला वाटप होईल.