आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय असल्याशिवाय रेशनचे धान्य देऊच नका, तहसीलदारांचे दुकानदारांना आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- केंद्र शासन आणि राज्य शासन विविध उपक्रम राबवून गावे आणि शहर दुर्गंधीमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरी उघड्यावर शौचास जाणारे महाभाग आहेतच. त्यांना पकडून न्यायालयात उभे केले जात आहे. त्यांना आर्थिक दंडाची शिक्षाही देण्यात येत आहे. आता यापुढे जाऊन ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना स्वस्त धान्य दुकानावरील धान्य व रॉकेल आदींचे वितरण करण्यात येणार नसल्याचे लेखी आदेशच नायगावच्या तहसीलदारांनी काढले आहेत. 

उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.  तरीही उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी होत नाही. हे प्रमाण केवळ ग्रामीण भागातच आहे, असे नव्हे तर शहरालगतच्या भागातही आहे. त्यामुळे महापालिकेनेही शहरालगत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले आहे. हे पथक उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना थेट न्यायालयातच हजर करत आहे. असे असले तरीही उघड्यावर शौचास बसणे थांबलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आता थेट शासकीय योजनांचा लाभच मिळणार नाही, अशी तरतूद करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नायगावच्या तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ज्या लाभार्थींकडे शौचालय आहे, अशाच ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानावरील धान्य वितरित करण्यात यावे. 
 
ग्रामसेवक युनियनने घेतला पुढाकार 
ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी ग्रामसेवक युनियननेही पुढाकार घेतला आहे. या युनियनने शौचालय असणाऱ्यांनाच शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निवेदन दहा जुलै रोजी प्रशासनाला दिले होते. त्याअनुषंगाने आता ज्यांच्याकडे शौचालय असल्याचे ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र आहे, अशांनाच  स्वस्त धान्य दुकानावरील धान्य व रॉकेल मिळेल.
बातम्या आणखी आहेत...