आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Couple Arrested In The Connection Of Sonography

नांदेडमध्‍ये गर्भलिंगनिदान करताना डॉक्टर दांपत्याला पकडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शहराच्या माणिकनगर भागातील मातोश्री हॉस्पिटलच्या डॉ. तनुजा बरडे आणि डॉ. श्रीनिवास बरडे या दांपत्याला महापालिका व शासनाच्या विभागीय दक्षता पथकाने शुक्रवारी (31 मे) सायंकाळी गर्भलिंगनिदान करताना रंगेहाथ पकडले. एजंट महिलेसह रिक्षाचालकाविरुद्धही न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. गर्भलिंगनिदान केलेल्या सोनोग्राफी यंत्राला सील ठोकण्यात आले असून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने नेमलेल्या विभागीय दक्षता पथकाने 31 मे रोजी डमी लाभार्थीच्या माध्यमातून नांदेड शहरात ही कारवाई केली. फीस म्हणून डॉक्टरच्या एजंटाला 12 हजार रुपये दिले होते. त्यापैकी डॉक्टरकडे 5 हजार रक्कम हस्तगत केली.