आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या संपाने रुग्णांची गैरसोय; रुग्णालये ओस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालये ओस पडल्याचे चित्र दिसत होते.

राज्यातील डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्यात काम बंद आंदोलन केले होते. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन येत्या दहा दिवसांत आपल्या सर्व मागण्या सोडवतो असे आश्वासन दिले होते. त्यामुळे डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाले होते. मात्र, 20 दिवस उलटूनही अद्याप शासनाने डॉक्टरांच्या मागण्यांचा कुठलाही विचार केला नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार, 1 जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील 50 प्राथमिक आरोग्य केंंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालये व तीन उपजिल्हा रुग्णालयातील सुमारे 227 वैद्यकीय अधिकार्‍यांनी मंगळवारी डॉक्टर दिनापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मंगळवारी सर्व जिल्ह्यातील डॉक्टरांनी औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर एकत्र येऊन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्य संघटक डॉ. विलास विखे पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. संदिपान काळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. फुलंब्री तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णसेवा कोलमडली होती.