आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Rajendrasingh Rana News In Marathi, Maharashtra, Divya Marathi

पाण्याच्या वाटपाचे ४३ टक्के वाद महाराष्ट्रात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - महाराष्ट्रामध्ये धरणांची संख्या मोठी असली तरी पाणी वाटपाचे वादही मोठे असून त्याचे प्रमाण तब्बल ४३ टक्के एवढे आहे. हे वाद सामंजस्याने सोडवण्यासोबतच; जलसाठ्याबाबत पर्याय निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत प्रसदि्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी येथे व्यक्त केले.

जिल्ह्याच्या मध्यातून वाहणा-या कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करणे आणि नदी स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नदी बचाव आंदोलनाचे डॉ. राजेंद्रसिंग राणा शहरात आले होते. कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी बोलताना डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले, की स्वातंत्र्यानंतर दुष्काळी स्थितीचे प्रमाण १० टक्क्यांनी तर पुरांचे प्रमाण ८ टक्क्यांनी वाढले आहे. या स्थितीला जबाबदार, शासनाचे पर्यावरण धोरण असून विकासाच्या नावावर विनाश केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बोअरवेलच्या माध्यमातून पाणी उपसले जात आहे. परंतु बोअरवेलच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नद्या लुप्त होत आहेत. या लुप्त होणा-या नद्या आणि त्यांच्या शाखा महापुराची स्थिती निर्माण करीत आहेत. हे टाळायचे असेल तर लुप्त होणा-या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा लोकसहभागातून कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. कवठे महांकाळ येथील नदी १९८५ च्या सुमारास पूर्णपणे लुप्त झाली होती. परंतु लोकसहभागातून ती नदी पुन्हा पुनरुज्जीिवत झाली. असाच प्रयोग कयाधू नदीबाबत करण्यात येणार असून नदीकाठच्या ७५ गावांना त्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही केले. या वेळी दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, अनिकेत लोहिया, सुनील जोशी (पुणे), उगम संस्थेचे प्रमुख जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.