आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.London House Of Dr. Babasaheb Ambedkar News In Divya Marathi

आंबेडकरांच्या घरासाठी भरले 3 कोटी; लंडनस्थित घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१-२२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वारस्य किंमत म्हणून एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरण्याचा निर्णय घेतला.
१ सप्टेंबर २०१४ रोजी घर मालकाने हे घर मे. सेडॉन्स या कंपनीमार्फत विक्रीला काढले होते. ही वास्तू सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक करावे, अशी आंबेडकरप्रेमींची मागणी आहे. ही इमारत खरेदी करण्याची इतर खरेदीदारांनी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सरकारनेही पावले उचलली. सरकारने सायमन रॉस यांची सॉलिसिटर म्हणून नियुक्ती केली. स्वारस्य बोलीसाठी १० टक्के म्हणजेच ३. १० कोटी रुपये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या निधीतून देण्याचा निर्णय घेतला. मे. सेडॉन्स सॉलिसिटर्सच्या लंडन येथील बरक्लीस बँकेतील खात्यावर ही रक्कम ताबडतोब जमा करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारचे उपसचिव दि. रा. डिंगळे यांनी बुधवारी सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाला ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.