आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा: वाघमारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून राष्ट्रीय एकात्मता अडचणीत आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत तथा माजी खासदार डॉ. जे. एम. वाघमारे यांनी बुधवारी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारांच्या कामगिरीचा उल्लेख करत डॉ. वाघमारे म्हणाले, या सरकारकडून राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेची केविलवाणी अवस्था केली जात आहे. त्यामुळे आपणासमोर धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. आज आपण विरोधक असलो तरी विरोधक म्हणूनही जनतेला न्याय मिळवून देता देऊ शकतो. कार्यक्रमास पक्षाचे प्रदेश सचिव अशोक गोविंदपूरकर, संजय शेटे, बबन भोसले, राजा मणियार, श्रीकांत सूर्यवंशी, अरविंद कांबळे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त िजल्हाधिकाऱ्यांकडे िवविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज द्यावे, पेरणीसाठी मोफत खते व बियाणे उपलब्ध करावेत, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित वितरित करावे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला एसटीचे अारक्षण द्यावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...