आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडेच्या आदर्श ग्राम योजनेत समावेशाने आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबवडे गावाचा सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश केल्याबद्दल भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर, दयानंद वनंजे, दयानंद सोनसळे, दिलीप दुगाने, दिलीप कंदकुर्ते आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छाया : सचिन डोंगळीकर - Divya Marathi
आंबवडे गावाचा सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश केल्याबद्दल भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर, दयानंद वनंजे, दयानंद सोनसळे, दिलीप दुगाने, दिलीप कंदकुर्ते आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छाया : सचिन डोंगळीकर
नांदेड -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबवडे गावाचा सांसद आदर्श ग्राम योजनेत समावेश केल्याबद्दल गुरुवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून ग्रामस्थांनी जल्लोष केला. सांसद ग्राम योजनेच्या निकषानुसार, आंबवडे गावची लोकसंख्या कमी असल्याने या गावाचा योजनेत समावेश होत नव्हता.
भाजपचे राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री वीरेंद्रसिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष बाब म्हणून आंबवडे गावचा योजनेत समावेश करण्याची विनंती केली होती. पंतप्रधान मोदी यांनी त्याची दखल घेऊन घटनाकारांच्या मूळ गावाचा योजनेत समावेश करण्यासाठी मान्यता दिली. याबद्दल भाजप राष्ट्रीय उद्यमी संवाद व शहर भाजपच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ढोल, ताशांच्या निनादात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, दयानंद वनंजे, ओमप्रकाश पोकर्णा, विजय सरपाते, विकास वाळकीकर, डॉ. दयानंद सोनसळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...