आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडाच्या महंतांना जिवे मारण्याची धमकी, पोलिसांनी पुरवले संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा संदर्भ देत ‘ताईंच्या भाषणाला विरोध केला, आमच्यात भांडणे लावता काय', असे म्हणत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना अज्ञात व्यक्तीने गुरुवारी ठार मारण्याची धमकी मोबाइलवरून दिली. त्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आले. भगवानबाबांची पुण्यतिथी रविवारीआहे. या पार्श्वभूमीवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला असून गडावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
डॉ. शास्त्री यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ९४२३७६२७६५ या क्रमांकावरून ९ ते १० वेळा फोन करुन अज्ञात व्यक्तीने मलाठार मारण्याची धमकी दिली.’ धमकी देणाऱ्या व्यक्तीने बीड जिल्ह्यातून फोन केल्याचे मोबाइल टॉवर लोकेशनवरून निष्पन्न झाले. तपासासाठी पोलिसांचे पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले आहे.
शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शास्त्रींशी संपर्क साधत माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे, निरीक्षक रा. जा. देसाई यांनी गडावरील बंदाेबस्त वाढवला.
भाषणबंदी विरोधात सूर गेल्या काही वर्षांपासून भगवानगडावर दसरा मेळावा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत होत असे. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे मेळाव्याला संबोधित करण्याची करण्याची प्रथा सुरू केली. यावर्षी मेळाव्यात राजकीय नेत्यांची भाषणबाजी होणार नाही, असा निर्णय महंतांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले. राज्यातील वंजारी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून गडाची ओळख आहे. भाषणबंदीचा निर्णय महंतांनी स्थगित करावा, असा प्रयत्न पंकजा समर्थकांनी चालवला आहे. दसरा मेळावा गडावर घेण्याचा निर्धार व्यक्त केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. रविवारी होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यात महंतांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केले गेल्यास जाब विचारण्यासाठी मुंडे समर्थक उपस्थित राहणार आहेत.