आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे चटके : अडीच हजार लोकांचे स्थलांतर, गाव ओस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- दुष्काळाची दाहकता मराठवाड्यात जाणवायला लागली आहे. मुखेड तालुक्यातील जुन्ना गट ग्रामपंचायतीत रोजगाराअभावी जवळपास अडीच हजार लोकांनी स्थलांतर केले असून, गाव ओस पडले आहे. गावात एकही तरुण वास्तव्यास नाही.
जुन्ना गट ग्रामपंचायतीत कुर्तळा तांडा, काळू तांडा, मानसिंग तांडा, लखू गंगाराम तांडा, लोभा तांडा, अर्जुन तांडा, लखू तांडा, सोसायटी तांडा ही ९ गावे असून, 7 हजार लोकसंख्येपैकी तीन हजार मतदार आहेत. यंदा जिल्ह्यात ४५ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट आहे. शिवाय तालुक्यात अजून रोहयोची कामे पुरेशी सुरू नाहीत. तालुक्यात गेल्या वर्षात रोहयोत भ्रष्टाचाराचे २३ गुन्हे दाखल झाले. यात माेठमाेठी मंडळी अडकली अाहेत. त्यामुळे रोहयोची कामे सुरू करताना प्रशासन विशेष काळजी घेत आहे. तहसीलदार, बीडीओ, ग्रामसेवक, अभियंता, पोस्टमास्तरसह तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष, सरपंच असे लोक आरोपी आहेत.
तीन वर्षांपासून बाहेर
मी कामाच्या शोधात पुण्यात आहे. रोजंदारीवर काम करतो. मजुरीतून कुटुंबाचा प्रपंच चालतो. दोन मुले, दोन मुली व पत्नी असे कुटुंब आहे. मुले शिक असल्याने पत्नी गावाकडेच आहे. - पांडुरंग रुपला चव्हाण, स्थलांतरित, रा. लोभा तांडा
सामाजिक वनिकरणाची १० कामे असून, त्यावर ३३ मजूर आहेत. वनविभागाच्या एका कामावर २११, पंचायत समिती अंतर्गत ४ कामांवर १७५ मजूर आहेत.
नाइलाजाने बाहेर जावे लागले
गावातील अडीच हजार लोक नाइलाजाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरकडे गेले. वृद्ध, मुलेच गावात आहेत. चाऱ्याअभावी २ हजार जनावरेही बाहेर आहेत. दरवर्षी किमान ४०० लोक गावात असायचे. आता शंभरही नाहीत. - बापूराव कांबळे, सरपंच, जुन्ना गट ग्रामपंचायत
गावाने फॉर्मच भरून दिला नाही
एआरईजीएसमध्ये ग्रामपंचायतींनी फॉर्म नंबर ४ भरून ग्रामसेवकामार्फत कामाची मागणी करावी लागते. जुन्ना गट ग्रामपंचायतीने अद्याप तशी मागणी केलेली नाही. तालुक्यात रोहयोच्या कामावर एकूण ४७७ मजूर आहेत. - एस. पी. भोळे, तहसीलदार, मुखेड