आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातही लातूरचा डाळ उद्योग नेटाने उभा; मिल बंदीचे प्रमाण नगण्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- तीनवर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि कडधान्ये उत्पादनाला बसलेला फटका अशा विपरीत परिस्थितीतही लातूरचा डाळ उद्योग जिद्दीने उभा आहे. उलाढाल आणि उत्पन्न अर्ध्यावर आले आहे.

बाजारात कडधान्यांची चणचण आहे. क्षमतेपेक्षा कमी उत्पादन करत लातुरातील डाळ उद्योजकांनी आपल्या मिल सुरू ठेवल्या आहेत हे विशेष. बहुतेक दालमिलमध्ये सध्या एका शिफ्टचेच काम सुरू असून उलाढाल तीन वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी घटली असल्याचे डाळ उद्योजक मनीष कलंत्री यांनी सांगितले.

लातूरमध्ये ८० ते ९० दालमिल आहेत. मूग, उडीद, तूर, हरभरा सोयाबीन या कडधान्यांवर प्रक्रिया येथे मोठ्या प्रमाणावर चालते. दुष्काळाची झळ डाळ उद्योगालाही बसली असल्याचे कलंत्री फूड प्रॉडक्टचे नितीन कलंत्री यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून डाळ उद्योगाला दुष्काळाचा, अपुऱ्या पावसाचा फटका बसतो आहे. लातूर हे देशातील नावाजलेले दालमिल हब आहे. येथील डाळीला दक्षिण भारतातून चांगली मागणी आहे. सध्या येथे ८० ते ९० दालमिल आहेत. पाऊस पीकपाणी चांगले असताना येथे तीन शिफ्टमध्ये काम चालते. येथील डाळ उद्योगामुळे ७५०० ते ८००० जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळालेला आहे. मागील तीन वर्षांच्या अवर्षणाची दालमिल उद्योगाला चांगली झळ बसली आहे. दिवसाकाठी ६० हजार क्विंटल डाळ उत्पादनाची क्षमता या उद्योगाची आहे.

मात्र, सध्या कडधान्ये कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बहुतेक दालमिल क्षमतेपेक्षा कमी एका शिफ्टमध्ये उत्पादन करत आहेत. सोयाबीन, तूर, हरभरा,उडीद, मूग आदींची आवक ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. वर्षाकाठी १८ लाख क्विंटल डाळ उत्पादनाची उलाढाल ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. ऐन दुष्काळातही डाळ उद्योगाचे उत्पादन नेटाने सुरू आहे.

लातूर डाळ उद्योगाचे चित्र
>दालमिल ८० ते ९०
>क्षमता ६०,००० क्विं / दिवस
>उलाढाल १८ लाख पोती वार्षिक
>प्रत्यक्ष रोजगार २५०० व्यक्ती
>अप्रत्यक्ष रोजगार ५००० व्यक्ती