आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून लांबला : अजिंठा लेणीत पर्यटकांची संख्याही घटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - पाऊस नसल्याने भकास वातावरणामुळे सध्या अजिंठा लेणीकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे.

अजिंठा परिसरात जून महिन्याच्या अखेरीस सर्व धबधबे ओसंडून वाहत असत. शिवाय परिसर हिरवाईने नटून जाई. त्यामुळे लेणी व परिसर पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत, परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने लेणी परिसरात भकास वाटत आहे. हजारोंच्या संख्येने येणा-या पर्यटकांची संख्या घटून चारशे-पाचशेवर आली आहे. यामुळे व्यावसायिकही संकटात सापडले आहेत.

जून महिन्यात पाऊस झाला की लेणी परिसर हिरवागार होई. या आल्हाददायक वातावरणामुळे देशी-विदेशी पर्यटक हजारोंच्या संख्येने यायचे. मात्र, यंदा जुलै उजाडला तरी उन्हाळा कायम जाणवत असल्याने पर्यटकांनी लेणीकडे पाठ फिरवली आहे. पावसाअभावी लेणी परिसर बकाल वाटत आहे. रोज चारशे ते पाचशे पर्यटक लेणीला भेट देत असल्याची माहिती व्यावसायिक मुजीब शेख यांनी दिली.

पावसाची छत्री उन्हासाठी
एरवी जून महिन्यात लेणीत पर्यटकांची संख्या वाढत असे. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री घेऊन येणारे पर्यटक उन्हापासून बचावासाठी छत्रीचा वापर करत आहेत.