बीड - कुष्ठरोगी, अनाथ, वंचित व उपेक्षितांच्या वेदनांवर फुंकर घालून त्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देणारा बाबा आमटे यांनी उभा केलेला आनंदवन प्रकल्प आता बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी संवेदना जागवणार अाहे. या भागात नेमके काय काम करता येईल याची चाचपणी करण्यासाठी अानंदवनच्या चमूने कौस्तुभ आमटे यांच्यासमवेत आष्टी तालुक्याचा पाच दिवसांचा दौरा केला आहे.
आनंदवनच्या प्रेरणेतून काम करणारे कार्यकर्ते जगभरात आहेत. शेती, सिंचन, रोजगार, विविध प्रकारचे उद्योग या सर्व प्रकारात काम करून समाजाने नाकारलेल्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम प्रकल्प करत आहे. आनंदवनाने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या प्रयत्नांमधून विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काम केलेले आहे. याचे सकारात्मक परिणामही आले आहेत. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, बीडची दुष्काळी स्थिती पाहून आनंदवनही काम करायला सरसावले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, पुण्याच्या समकालीन प्रकाशनामुळे संपर्क... लवकरच काम सुरू...