आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drout Affected Farmer Try To Suicide In Front Of Drought Troop In Parabhani District

शेतकऱ्याचा पथकासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न, सोनपेठ तालुक्यातील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पाहणी करण्यासाठी सगळेच येतात. परंतु कोणी काई देत नाही..निसर्ग कोपलाय..आता दुष्काळ खूप झाला, साहेब... काही तरी भरीव मदत करा, असे म्हणत आपल्या शेतातील करपून गेलेले ज्वारीचे पीक दाखवताना सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांच्या भावना अधिकच अनावर झाल्या. त्यांनी केंद्रीय पथकासमोरच गळ्यातील रुमालाने फास घेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी त्यांना हा प्रकार करताना रोखले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नांदेड जिल्ह्याचा दौरा आटोपून शनिवारी सायंकाळी सोनपेठ तालुक्यात दाखल झाले.
...अन‌्अनर्थ टळला
परळी-गंगाखेडमहामार्गावरील वडगाव येथील रस्त्यालगतच्या शेतांची पाहणी करण्यासाठी हे पथक थांबले होते. त्यांनी रस्त्यालगतच्याच शेतीची पाहणी केली. या वेळी वडगाव येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांनी शेतीची स्थिती दाखवताना बोलीभाषेत अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांची सरबत्तीच केली. काही वेळ केंद्राच्या अधिकाऱ्यांना त्यांची उर्वरित.पान

भाषाचउमजली नाही. केंद्रीय पथकालीत अधिकाऱ्यांशी बोलताना वडगावच्या हरिभाऊ जाधव या शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्या आणि या पथकासमोरच गळ्यातील रुमाल काढून स्वतचा गळा आवळून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने गांगरलेल्या सर्वानीच मध्यस्थी करत त्यांना या प्रकारापासून रोखले. जिल्हाधिकारी महिवाल यांनी जाधव यांचा हात धरून त्यांना असे काही करू नका, अशी विनंती केली. त्यामुळे जाधव शांत झाले. या प्रकारामुळे काही वेळ परिस्थिती तणावाची झाली होती. जाधव यांना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करीत शांत केले. त्यावर जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती पथकातील जलसंसाधन मंत्रालयातील वरिष्ठ सहआयुक्त सतीश कामभोज केंद्रीय अन्नधान्य महामंडळातील वरिष्ठ अधिकारी एम.एम.बोर्हाडे यांना दिली.

जाधव यांना दीड एकर शेती, मुलांच्या हातालाही काम नाही
वडगाव येथील शेतकरी हरिभाऊ जाधव (५८) यांना केवळ दीड एकर जमीन असून दोन मुले आहेत. मुलांच्याही हाताला काम नसल्याने ते शेतातच काम करतात. मागील तीन वर्षांपासून शेतातील उत्पन्नच निघत नसल्याने कसाबसा संसार चालवावा लागत आहे. शेतात विहीरही नसल्याने पाण्याची व्यवस्था नाही. यावर्षी पाऊस नसल्याने खरीपाचे पीक नाममात्र निघाले. खर्चही निघाला नाही. त्यानंतरही कशीबशी रबीसाठी ज्वारीची पेरणी केली. सुरुवातीला जमिनीतील ओलाव्यावर आलेली ज्वारीही आता पार करपून गेली आहे.
अन्यथा मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे सत्र :
गेल्या तीन वर्षांत या भागातील शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न झाले नसून येणारे पूर्ण वर्ष भागवायचे कसे, असा प्रश्नआहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्या अन्यथा मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे सत्र सुरू होईल, अशी भीतीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर उपसभापती दशरथ सूर्यवंशी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पथकाला दिलेल्या निवेदनात व्यक्त केली.

खराब रस्त्यामुळे मार्ग बदलला :
सोनपेठ तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दैनावस्था आहे. मात्र, केंद्रीय पथकाच्या नियोजन दौऱ्यात या तालुक्यातील गावाची पाहणी होती. त्यामुळे थेट सोनपेठला जाता हे पथक परळीहून सिरसाळा मार्गे पुन्हा सोनपेठ येथे आले. विटा, वडगाव येथे पाहणी करून पथक पाथरी तालुक्यात गेले. पाहणी दौऱ्याचा फार्सच पथकाने पूर्ण केला.

अन् अनर्थ टळला....
उदरनिर्वाह अवघड, दुसरा पर्यायच नाही
^दुष्काळामुळेमाझा कुटुंबाचा उदरनिर्वाह जनावरांचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. माझ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. शेती कमी असल्याने बँकाही कर्ज देत नाहीत. -हरिभाऊ जाधव, शेतकरी,वडगाव

मानसिकता खचल्याने उचलले टाेकाचे पाऊल
शेतकरीहरिभाऊ जाधव यांची मानसिकता खचल्याने त्यांनी निराश होऊन तसे पाऊल उचलले होते. परिस्थिती अतिशय बिकट आहे. प्रशासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांनी मनोधैर्य खचू देता संकटाचा सामना करावा. -राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी
उस्मानाबाद तालुक्यातील आळणीच्या शेतकऱ्यांनी पाहणी पथकाला घेराव घालून रोष व्यक्त केला.