आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dry Port Project Report Will Submit Centre State Minister Danve

ड्राय पोर्टचा प्रकल्प अहवाल केंद्राला देणार, राज्यमंत्री दानवे यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जालन्याजवळ प्रस्तावित असलेल्या ड्राय पोर्टच्या जागेसाठी जेएनपीटीच्या अधिका-यांच्या समितीने शुक्रवारी पाहणी केली. आता यासंदर्भातील प्रकल्प अहवाल लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जवळपास १५ हजार कोटी रुपये खर्च करून जालना शहराजवळील दरेगाव येथे हा ड्राय पोर्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिका-यांनी प्रस्तावित जागेला भेट दिली त्यानंतर मंत्री दानवे यांच्याशी चर्चा केली. हा प्रकल्प मंजूर करून घेतल्यानंतर तो जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. हा पोर्ट पूर्ण झाल्यास येथील औद्योगिक क्षेत्रासाठी त्याचा मोठा उपयोग होईल, त्यािशवाय कृषी उत्पादने निर्यात करण्यासाठी त्याचा लाभ होणार असल्याचे दानवे यांनी याप्रसंगी सांगितले.

सध्या कारखान्यांना एक कंटेनर मुंबईहून जालन्यापर्यंत आणण्यासाठी २८ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. पोर्ट कार्यान्वित झाल्यास हा खर्च १६ हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

दोन मंत्रिपदे हवी
जायकवाडी योजनेतून अंबडला पाणी देण्याच्या निर्णयसंदर्भात दोन्ही पालिकेचे नगराध्यक्ष, अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली जाईल. त्यात तांत्रिक मुद्द्यांचा विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल असे दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात जालना जिल्ह्यात मित्रपक्ष आणि भाजपला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षाही राज्यमंत्री दानवे यांनी व्यक्त केली.