आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीमुळे एसटी महामंडळाला दिन ‘टोलफ्री’मुळे १३ लाख ४१ हजारांचा लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र ओरड होत असली तरी एसटी महामंडळाला मात्र अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. ५०० व १००० च्या नोटाबंदीमुळे टोलनाक्यावर मोठी अडचण निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर शासनाने १२ पासून टोलवसुली २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत थांबवली होती. याचा एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला १३ लाख ४१ हजार ५१२ रुपयांचा फायदा झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज मुंबई, पुणे, हैदराबाद, नाशिक, कोल्हापूर, पणजी, नांदेड, सुरत, धुळे, नागपूर अशा विविध मोठ्या शहरांमध्ये बससेवा सुरू आहे. यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद व नाशिकला जाणाऱ्या बसची संख्या मोठी आहे. परंतु, यामार्गावर जागोजागी एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात टोल द्यावा लागत होता. एकट्या उस्मानाबाद विभागामार्फत दरमहा या टोलसाठी २० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च होत होती. अर्थातच याचा भार एसटीकडून प्रवाशांवर विविध माध्यमातून टाकला जात होता. एसटी महामंडळ तोट्यात असल्याची आेरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी जे काही कारणे आहेत त्यामध्ये टोलचाही समावेश आहे. सुरुवातीपासूनच टोलच्या कचाट्यातून एसटी महामंडळाच्या बस वगळण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, अद्यापपर्यंत तरी या मागणीचा विचार झालेला नाही. त्यातच एसटी बस ही मोठ्या अवजड वाहनात मोडत असल्याने टोलही तेवढाच दमदार द्यावा लागतो. परिणामी दरमहा या सर्वसामान्यांच्या एसटीच्या तिजोरीवर पर्यायाने सर्वसामान्यांच्या खिशावर २० लाखांचा टोलभार पडत होता. मात्र, २ डिसेंबरेपर्यंत टोल माफी जाहीर केल्याने याचा एसटीलाही फायदा झाला आहे.

पुणे, मुंबईला सर्वाधिक बसफेऱ्या
जिल्ह्यातील हजारो नागरिक पुणे, मुंबई येथे शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी यासाठी स्थायिक झालेले आहेत. त्यांचे सतत जिल्ह्यात आपल्या गावाकडे येणे-जाणे सुरू असते. तसेच येथील व्यापारीही खरेदीसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे येतो-जातो. त्यामुळे रेल्वेसेवा, एसटीच्या बस तसेच खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्याही डझनावरी बस या मार्गावर धावतात. त्यामुळे दरराेज लाखो रुपयांचा टोल जिल्ह्यातून भरला जातो. मात्र या २० दिवसांतील टोलमाफीमुळे एसटीसह खासगी बसवाहतूक चालकांनाही मोठा फायदा झाला आहे. या फायद्यामुळे एसटीचे पैसे काही प्रमाणात वाचले.

डेपोनिहाय बचतीची रक्कम (२० दिवस)
उस्मानाबाद १,७६,३३८
उमरगा १,५१,७१०
भूम ४३,०१२
कळंब ७८,०००
परंडा १९,०००
तुळजापूर ९५,७४२
बातम्या आणखी आहेत...