आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात बनावट नोटा जप्त; चौघांना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - बनावट नोटांचा व्यापार विस्तारला असून त्या चलनात आणण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी एका घरातून पोलिसांनी 1 लाख 85 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. फळविक्रेत्याच्या समयसूचकतेने पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्या अन्य तीन साथीदारांनाही अटक केली. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील रेणापूर रोडवरील इस्माईल बागवान यांच्या फ्रूट स्टॉलवर सोमवारी महंमद समाऊल महंमद कयासअली शेख (24) याने 90 रुपयांचे सफरचंद खरेदी केले. त्याने दुकानदारास एक हजाराची नोट देऊन 910 रुपये परत घेतले. तथापि फळविक्रेत्यास नोटेविषयी शंका आल्याने त्याने त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक हजार रुपयांच्या 4 बनावट नोटा आढळल्या. त्याने आपण झारखंडमधील दक्षिण कोलस कच्छी येथील असून 5 साथीदारांसह शामनगर येथे भाड्याच्या खोलीत राहतो, असे सांगितले.
आपला टोळीप्रमुख झारखंडमधील सैफोद्दिन शेख असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, सैफोद्दीन फरार झाला आहे असून त्याला पकडण्यासाठी दोन पोलिस पथके झारखंडला रवाना करण्यात आली आहेत.