आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट फेसबुकवरून लुटणाऱ्या तरुणाला पोलिस कोठडी; निगडी पोलिसांची अंबाजोगाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यांच्या चाहत्यांना लुबाडणाऱ्या तरुणास निगडी पोलिसांनी अंबाजोगाईत अटक केली आहे. 
  
प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गीतांनी सध्या मराठी तरुणाईला वेड लावले आहे. आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे यांच्या गायकीला  गौरवशाली परंपरा आहे. त्यांच्या गायनाची ख्याती ओळखून  अंबाजोगाईच्या संतोष गौतम उजगरे (रा. क्रांतीनगर) याने आदर्श शिंदे यांच्या नावाने बनावट फेसबुक  खाते उघडून तरुणींसह महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र यादीत सामील करून घेतले. अशा तरुणींशी आदर्श शिंदे यांच्या नावाने चॅटिंग करून ओळख वाढवत पैसे मागण्यास सुरुवात केली. हा प्रकार आदर्श शिंदे यांच्या लक्षात येताच याचा पाठपुरावा करत भाऊ उत्कर्ष शिंदे यांच्यामार्फत पुण्यातील निगडी पोलिस ठाण्यात  थेट तक्रार दाखल केली. 
या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी संतोष गौतम उजगरे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ११ मार्च रोजी निगडी पोलिसांच्या पथकाने अंबाजोगाई पोलिसांच्या  मदतीने संतोष उजगरे यास अंबाजोगाईतून ताब्यात घेऊन पुणे येथील न्यायालयापुढे सादर केले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

पाच मुलींची फसवणूक   
याप्रकरणी आतापर्यंत ५ मुलींनी पुढे येत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले असून, आणखी काही तक्रार देण्यासाठी पुढे येतील, असे निगडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औताडे यांनी 
सांगितले  आहे.
बातम्या आणखी आहेत...