आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Duplicate Royalty Reside Seven Parson In Lock Up

बनावट रॉयल्टी पावत्या; 7 जणांना पोलिस कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- बनावट रॉयल्टी पावत्या दाखवून पोलिसांची दिशाभूल करणार्‍या 7 वाळूचोरांना पैठण पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तालुक्यातील कुरणपिंप्री, नायगाव वाळूपट्ट्यातून क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेऊन जाणार्‍या 22 वाहनांवर 20 मे रोजी पैठण पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान ट्रकचालकांकडे असलेल्या रॉयल्टी पावत्यांसंदर्भात पोलिसांना संशय आला होता. पावत्यांची तपासणी केली असता 48 पैकी 32 रॉयल्टी पावत्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले होते.

प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी जी. श्रीधर यांनी 20 मे रोजी क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेऊन जाणार्‍या 22 वाहनांवर धडक कारवाई केली. या वेळी चालकांकडे बनावट रॉयल्टी पावत्या असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी या ट्रकचालकांकडून पावत्या हस्तगत केल्या. त्या पावत्या जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्याकडे पाठवल्या. तपासात 48 पैकी 32 रॉयल्टी पावत्यांच्या पाठीमागे स्वाक्षरी व शिक्का नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी सलीम पटेल, शेख अकील जलाल, संजय जाधव, गोकूळ मालुरे, बाबूराव बोबडे, जावेद पठाण, शाहरुख पठाण यांच्यावर दाखल करण्यात आला.