आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव झाले तंटामुक्त, बक्षिसाच्या रकमेतून शाळांत ई-लर्निंग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गावांतील विविध प्रश्नांवर संघटित होत ग्रामस्थांनी गावाला तंटामुक्त केले. नवीन पिढी तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळांतील नादुरुस्त खोल्यांची दुरुस्ती केली. तसेच पुढील पिढीला दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील तंटामुक्त पुरस्कार मिळणाऱ्या ३१ गावांपैकी १९ गावांमधील जिल्हा परिषद शाळांत ई-लर्निंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाचा झपाट्याने विकास होण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे महत्त्वाचे ठरते. यासाठी ग्रामस्थांसह शिक्षकांचाही कल असतो. दरम्यान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात २०१३-१४ या वर्षात बक्षिसास पात्र झालेल्या ३१ गावांना बक्षीसरुपी तब्बल ६७ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांशी गावांनी या पैशाचा वापर विकास होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा, स्वच्छता मोहीम, पथदिवे, रस्ता दुरुस्ती, सभागृह आदी कामांवर करुन विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या खोल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे चार-चार वर्ग एकाच खोलीत बसवून शिकवावे लागत असल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. दरम्यान, सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामस्थ यांच्या संघटीतपणामुळे महात्मा गांधी तंटामुक्त अभियानअंतर्गत जिल्ह्यातील ३१ गावांना प्रत्येकी लाख, लाख रुपये बक्षीस म्हणून िमळाले. संगणकाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा म्हणून तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेतून शाळा दुरुस्तीबरोबरच शाळांत ई-लर्निंग सुरू करण्यात आले. यातून गावचा विकास साधण्याबरोबरच येणारी पिढीही दर्जेदार शिक्षण घेवून संस्कारक्षम होवून विकासाचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे भावी पिढीही तंटामुक्तीच्या त्रासापासून मुक्त होत आहे. या मोहीमेला वेग देण्यासाठी पोलिस दलाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत.

ग्रामस्थांचे संघटन
>ग्रामस्थांचेसंघटन असल्यामुळे श्रीधर जवळा गाव पात्र ठरुन लाख रुपये मिळाले. या पैशाचा विनियोग होण्यासाठी वृक्ष लागवड, शाळेला कलर, पथदिवे, अंगणवाडी, पाणी फिल्टर, शाळेची दुरस्ती आदी कामे केली आहेत. तसेच दैनंदिन शिबीराच्या माध्यमातून युवकांमध्ये संघटन घडविण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात नवीन संकल्पना राबविणार आहेत.
-महादेव राजबिंडे, तंटामुक्त अध्यक्ष, श्रीधर जवळा

गाव विकासावर भर
>सर्वांच्याचसहकार्याने तत्कालीन सरपंचाच्या कालावधीत गाव तंटामुक्त होऊन बक्षीसास पात्र ठरले आहे. यातून गावचा विकास साधण्याबरोबरच येणाऱ्या पिढीला एक सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. यावर्षीही गाव तंटामुक्त करण्यासाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत.
-सिंधुबाई भुतेकर, सरपंच, हिवर्डी.
बातम्या आणखी आहेत...