आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद शहराला भूकंपाचा सौम्य धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा - तालुक्यातील विविध भागांत गुरुवारी (दि. १८) रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. त्यामुळे तालुकावासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, उस्मानाबाद शहरालाही दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

गुरुवारी तालुक्यातील सास्तूर, राजेगाव, चिंचोली (रेबे), होळी, मुर्शदपूर, कोंडजीगड, माकणी, करजगाव, चिंचोली (काटे) यासह उमरगा तालुक्यातील पेटसांगवी, समुद्राळ आदी परिसराला भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे जमीन हादरून अनेकांच्या घरावरील पत्र्यांचा ‘थर्रर’ असा आवाज झाला. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले. या धक्क्यामुळे ३० सप्टेंबर १९९३ मध्ये झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी नागरिकांच्या डोळ्यासमोर तरळल्या. त्या वेळीदेखील किल्लारी, सास्तूर याच परिसराला सर्वाधिक धक्का बसून अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती. दरम्यान, लातूर येथील भूकंप मापन केंद्राशी संपर्क साधला असता किती रिश्टर स्केलची नोंद झाली, याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याचे
सांगण्यात आले.