आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबादेत दररोज 20 हजार रुपयांच्या कापडी पिशव्यांची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कॅरीबॅगमुक्त शहर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेला व्यापार्‍यांसह नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. शहरातील ठोक व्यापार्‍यांनी एकत्र येऊन मुंबई येथून जवळपास 1 लाख रुपयांच्या कापडी पिशव्या खरेदी केल्या आहेत. उस्मानाबादेत दररोज कापडी पिशव्यांची सुमारे 20 हजार रुपयांची विक्री होऊ लागली आहे. काही प्रमाणात छुप्या पध्दतीने कॅरिबॅगचा वापर होत असला तरी पर्यायी व्यवस्था होऊ लागल्यामुळे हा वापर अगदी नगण्य स्वरूपाचा आहे.‘दिव्य मराठी’ने याबाबत 6 महिन्यांपासून जनजागृती सुरू केली आहे.

उस्मानाबादेत व्यापार्‍यांनी कापडी पिशव्या विक्रीस ठेवल्या आहेत. तसेच तुळजाभवानी व्यापारी संकुलात राधेकृष्ण बचत गटाने कागदी पिशव्यांचे विक्री केंद्र सुरू केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालिकेने शहरात कॅरीबॅगमुक्ती अभियान राबविले आहे. व्यापार्‍यांना कागदी व कापडी पिशव्या विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला ठोक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच नागरिकही कापडी पिशव्यांची मागणी करीत आहेत. पूर्वी नागरिक 20 ते 30 रुपयांच्या किराणा वस्तू खरेदी करून कॅरीबॅगची मागणी करीत होते. मात्र, कॅरीबॅगमुक्ती अभियानामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक दुकानदारांना कॅरीबॅगची मागणी करीत नाहीत. किरकोळ विक्रेते समीयोद्दीन शमसोद्दीन मनीयार यांनी सांगीतले की, ग्राहकांना विक्रीसाठी 5 हजार रुपयांच्या कापडी पिशव्या आणल्या आहेत. शेकड्यावर खरेदी केल्यास 5 रुपयांची पिशवी 3.50 रुपयांना दिली जाते. त्यामुळे शहरातील बहुतांश दुकानात कापडी पिशव्या विक्रीस अडकवलेल्या दिसत आहेत. पूर्वी शहरात दररोज जवळपास 10 ते 15 हजार रुपयांच्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग विक्री केल्या जात होत्या. सध्या प्लास्टिक कॅरीबॅगऐवजी विक्रेत्यांनी कापडी पिशव्या विक्रीस ठेवून पालिकेच्या कॅरीबॅगमुक्ती अभियानास प्रतिसाद दिला आहे.
कॅरीबॅगमुक्तीला प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी दुकानांत कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. चांगला वापर केल्यास कापडी पिशव्या तीन ते चार महिने टिकतात. प्लास्टिकच्या कॅरीबॅगमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून निसर्गचक्र बिघडते. त्यामुळे मी कापडी पिशवीचा वापर करतो.’’
मारुती सोनवणे, गावसूद.

४ठोक व्यापारी एकत्र येऊन मुंबई येथून कापडी पिशव्यांची खरेदी करत आहेत. येथे शेकडा 3.50 रुपयांना कापडी पिशवी विकतो.’’
समीयोद्दीन मनीयार, व्यापारी.

कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. बचत गटाला कापडी पिशव्या बनविण्याच्या मशीनसाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.’’
विजया पाटील, राधेकृष्ण बचत गट.
कॅरीबॅग विक्री केंद्र बंद
शहरात काही ठिकाणी कॅरीबॅग विक्री सुरू होती. पालिकेने कॅरीबॅगमुक्ती अभियान सुरू केल्यापासून हे दुकान बंद पडले आहेत. अन्य विक्रत्यांनी कापडी पिशव्या विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
कागदी पिशवी विक्री केंद्र
पालिकेने तुळजाभवानी व्यापारी संकुलात (बसस्थानकासमोर) राधेकृष्ण बचत गटाच्या माध्यमातून प्लास्टिक कॅरीबॅगला पर्यायी कागदी पिशवी विक्री केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून व्यापारी कागदी पिशव्या घेऊन जात आहेत.