आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education For The Droughty Afflicted Farmers Soon

शेतकऱ्यांच्या ३२५ मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, दुष्काळग्रस्तांसाठी भारतीय जैन संघटनेचा हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कमी पावसामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा या संकटामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून बीडसह लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३२५ मुला-मुलींच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी घेतली अाहे.

बीडसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत १ जानेवारी २०१५ पासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सर्व्हे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने १३ टीम पाठवण्यात आल्या होत्या. या सर्व्हेमुळे मराठवाड्यातील दुष्काळाचे वास्तव समोर आले. या तीनही जिल्ह्यांतील ४२२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील १९३ मुले व १३२ मुली अशा ३२५ पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे. त्यापैकी २१३ मुला-मुलींच्या परिवारांनी सर्व्हे करत असताना पुण्याला जाण्यासाठी संमती दिली आहे. तीनही जिल्ह्यांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी १८-२४ वर्षे वयोगटांतील संख्या सात टक्के असून २५-३४ वयोगटांतील संख्या २० टक्के आहे. ३५-४४ वयोगटांतील संख्या २५ टक्के आहे. म्हणजे आत्महत्या केलेल्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे तरुण व मध्यमवयीन आहेत. पुण्याजवळील वाघोली येथील संघटनेच्या प्रकल्पात अशा मुलांचे शिक्षणासह निवास, भोजन, आरोग्य, मानसिक समुपदेशन, शालेय साहित्य अशी सर्वच जबाबदारी संघटनेने घेतली असून मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन केले जाणार आहे. यामध्ये ६० टक्के मुले व ४० टक्के मुली असणार आहेत.

७६ टक्के लोक अल्पभूधारक
मराठवाड्यातील बीडसह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ७६ टक्के शेतकऱ्यांकडे २ हेक्टरच्या आत जमीन आहे. म्हणजेच एक तर पडीक व त्यातही ७६ टक्के लोक अल्पभूधारक आहेत. आत्महत्या केलेल्या कुटुंबातील शेतकऱ्यांपैकी ७४ टक्के शेतकऱ्यांकडे जिरायती जमीन असून सात टक्के शेतकऱ्यांकडे पडीक जमीन आहे, तर पाच टक्के शेतकऱ्यांकडे जमीनच नाही.
मुलांचा आत्मविश्वास वाढेल
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मुला-मुलींना आम्ही दत्तक घेत असून विद्यार्थ्यांसाठी हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्यांच्यातील बदल आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मुला-मुलींवर आलेला तणाव कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल.
शांतीलाल मुथा, अध्यक्ष, भारतीय जैन संघटना