आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिराढोण परिसरात मुबलक पाण्यामुळे रब्बीकडून बळीराजाला अपेक्षा; पिकांना पाणी देण्यासाठी धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण - शिराढोणपरिसरातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा भारनियमनावर मात करून रब्बी हंगामातील पिके फुलविण्यासाठी तुषार सिंचनाच्या वापरास सुरुवात केली आहे.
चांगल्या पावसामुळे सरासरीपेक्षा अधिक रब्बी पेरणी झाल्याने चांगले उत्पादन घेण्यासाठी परिसरातील शेतकर्या्ंनी कंबर कसली आहे. चार वर्षातली तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केवळ आठ तास वीजपुरवठा होत असून सतत विजेचा लपंडावर सुरू आहे. यामुळे सर्रास शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

यंदा मंडळात खरिपाची ९० टक्के परणी झाली होती. यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होता. पावसाच्या असमतोलामुळे खरिपातील अपेक्षित पीक शेतकऱ्यांना पदरात पडले नाही. मात्र, दमदार पाऊस झाल्याने मुबलक पाणीसाठा झाला. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी यासइ इतर पीक आहेत. सध्या ही पीके जोमात आहेत.

मात्र, केवळ आठ तास वीजपुरवठा तोही कमी अधिक होत असल्याने पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. रब्बी हंगामातील पिकांवर आर्थिक गणिते असल्याने सर्रास शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर सुरू केला आहे. सोयाबीन काढल्यानंतर परिसरातील ७० टक्के शेतकऱ्यांनी मोठ्या आपेक्षेने रब्बीची पेरणी करून उत्पन्नाच्या अपेक्षा ठेवल्या आहेत. महावितरणच्या भारनियमणाच्या वेळ लक्षात घेऊन शेतकरी आपल्या पिकांना पाणी देत आहे. यामुळे पाण्याचा अपव्ययही टाळण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे.

प्राप्त झाले गतवैभव
आवाड शिरपूरा, दाभा, हिंगणगाव, सौंदणा आंबा गावांतील शेतकरी ऊस उत्पादक आहेत. दुष्काळाने ही ओळख पुसली होती. पुन्हा परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने गतवैभवासाठी शेतकरी कामाला लागला आहे.

जलयुक्तचा फायदा
शिराढोणयेथून गेलेली किलोमीटर लांबीची ढोरी नदीचे लोकसभाग तसेच शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरण रुंदीकरण करण्यात आले होते. यावर्षी दमदार पावसामुळे फायदा विहीर, कूपनलिकेला फायदा झाला आहे.
शिराढोण परिसरात पिकांना तुषार सिंचनाने पाणी देण्यात येत आहे
जास्तीच्यापावसानेखरिपातील उत्पन्न घटले. रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांची पेरणी केली आहे. विजेच्या लपंडावामुळे तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यात येत आहे. यामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पन्न निघेल अशी आपेक्षा आहे -रिजवानदखणी, शेतकरी, शिराढोण.
.

खरीप तुरही जोमात
अनेक शेतकऱ्यांनी गत वर्षीचे तुरीचे वाढते भाव लक्षात घेऊन पेरणी केली आहे. सध्या तुरीचे पिकही जोमात आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. यातून चार वर्षाची तूट भरून काढण्यात फायदा होणार आहे.
‘तुषार’ने भारनियमनावर मात, फुलविले रान
बातम्या आणखी आहेत...