लातूर- मराठवड्यात भीषण दुष्काळ असून त्याच्या सर्वाधिक झळा लातूरकरांना सोसाव्या लागत आहेत. दुसरीकडे, राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या हवाई हौसेपोटी तब्बल 10 हजार लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
खडसेंनी शुक्रवारी लातूरचा दौरा केला. लातूर शहरापासून बेलकूंड हे गाव अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आहे. 15 मिनिटांच्या या प्रवासासाठी खडसेंनी कार न वापरता चक्क हेलिकॉप्टरमधून जाणे पसंत केले. मात्र, खडसेंच्या हेलिकॉप्टरसाठी बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी 10 हजार लिटर पाण्याची फवारणी करण्यात आली. दरम्यान, हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याची माहीती नव्हती, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
लातूर येथे पत्रकार बैठकीत खडसे यांनी दुष्काळग्रस्त भागात सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मातोळा दहा खेडी पाणीपुरवठा योजना बंद होती. त्याची डागडुजी करून ती सुरू करण्यात आल्याचे खडसेंनी यावेळी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, खसडेंनी असा केला दौरा...