आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 Maharashtra Politics Latest News In Marathi

मुंडेंच्या पराभवाची भाजपकडूनच चौकशी! शरद पवारांचा आष्टीत गौप्यस्फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - बीड लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे. यात भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या पराभवासंदर्भात भाजपमधीलच काही मंडळी चौकशी करत आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जाहीर सभेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आष्टीच्या सभेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, गुजरात राज्यात माधवसिंह सोलंकी, अमरसिंह चौधरी, चिमणभाई पटेल या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी प्रभावी कामगिरी करून साधलेला विकासदर मोदींनी निम्म्यावर आणून ठेवला आहे. असा विकास करणारे नेतृत्व देशाला परवडणारे नाही, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक राजकीय पक्षात गटबाजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपतूनच चौकशी होत असून राज्यमंत्री सुरेश धस हेच गोपीनाथ मुंडेंचा पराभव करतील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.
युतीला राज्य करता आले नाही
भाजप-शिवसेना युतीला यापूर्वी पाच वर्षे राज्य करण्याची संधी जनतेने दिली होती, परंतु त्यांना राज्य करता न आल्याने लोकांनी पाच वर्षांनी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

पुढील स्ला्इडमध्ये, सिंचन घोटाळा दडपण्यासाठी अर्थमंत्र्यांनीच मंत्रालय जाळले