आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 Uddhav Rally At Parbhani News In Marathi

पवारांचा पक्षच गद्दारीतून तयार - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शिवसेनेच्या गळतीवर जर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल तर या गळतीतील दोन-चार थेंब घ्या. परंतु ज्यांचा पक्षच गद्दारीतून तयार झाला, त्यांना पक्ष काय समजणार, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लगावला. आम्ही शिवरायांचे भक्त असून तुमच्यासारखे पाठीमागून वार करणारे नाही, वेळ आलीच तर समोरून वार करणारे आहोत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.नऊ) येथे झालेल्या जाहीर सभेत केला.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ स्टेडियम मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीकास्त्र सोडलें.
कोणत्याही प्रकारच्या स्वागताचा सोपस्कार पार न पाडता ठाकरे यांनी थेट भाषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काठी, घोंगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ठाकरे म्हणाले, मराठवाड्यातील जनता ही भगव्याची निष्ठावंत आहे. याही वेळी ही जनता भगव्याच्याच
पाठीशी राहील.
पक्ष न सोडण्याची दिली शपथ
शिवसेनेचा उमेदवार निवडण्याची परभणीची परंपरा कायम ठेवा, असे आवाहन करताना ठाकरे यांनी येथील खासदार पक्ष सोडून जातात, ही दुर्दैवी बाब आहे. परंतु यापुढे असे होणार नाही. परभणीच्या मातीशी बेइमानी करणार नाही, अशी शपथ घेण्याचे आदेशच त्यांनी उमेदवार आमदार संजय जाधव यांना दिले. भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी आमदार जाधव यांना जवळ बोलावून शपथ घेण्याचे सांगितले.