आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Action Against Raj Thackeray

गारपीटग्रस्तांना मदत: राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील काही गारपीटग्रस्तांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आर्थिक मदत केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यानुसार व अन्य अहवाल एकत्रित करून आचारसंहिता भंग झाल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे विकासासाठी निधी मंजूर झाल्याविषयीच्या बातम्या दिल्या आहेत. त्या संदर्भात चौकशी केली असता शासन निर्णय असल्याने प्रथमदर्शनी निदर्शसनास आल्यामुळे तसा अहवाल आयोगाकडे पाठवला आहे.
पालकमंत्री क्षीरसागर यांनी कोणतीही नवीन घोषणा केली नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले आहे. 13 मार्च रोजी राज ठाकरे यांनी वडवणी तालुक्यात पिंपरखेडला भेट दिली. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या सत्यभामा कानडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याकुटुंबियास 50 हजारांची मदत केली होती.
दरम्यान, जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमध्ये शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्यात उमेदवारांनी आर्थिक मदत देणे चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर लक्ष ठेवून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आयोगाला अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत. राजकीय पक्ष अथवा राजकीय व्यक्तीकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, उमेदवार असोत वा राजकीय कोणत्याही पक्षातील पुढारी तसेच इतरांकडून कोणत्याही माध्यमातून गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील यंत्रणेला आदेशित केले आहे.

छायाचित्र - संग्रहित