आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६ टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या १८ जागांसाठी रविवारी (दि.११) ९६.३५ टक्के मतदान झाले. चारही मतदारसंघात मतदारांचा उत्साह अपूर्व दिसून आला. एकूण ३२८७ मतदारांपैकी ३१६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि.१२) मतमोजणीनंतर तीन पॅनलनी या निवडणुकीसाठी सर्वार्थाने लावलेली ताकद दिसून येणार आहे. दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा व अस्तित्वाची ही निवडणूक ठरली.

मागील महिनाभरापासून सुरू असलेली बाजार समितीच्या निवडणुकीची सांगता रविवारी मतदानाने झाली. ग्रामीण व शहरी सत्ताकारणाचे व अर्थकारणाचे केंद्र म्हणून बाजार समितीच्या या निवडणुकीत जिल्हास्तरीय नेतृत्वाने मोठी ताकद लावत लक्ष्मीअस्त्राचा वारेमाप वापर केल्याने ही निवडणूक अत्यंत चर्चेची व चुरशीची ठरली आहे. आपल्या ठराविक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदानाचा टक्का वाढला.
सहकारी संस्था मतदारसंघातील ९१५ मतदारांपैकी ९०९ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदारसंघात ९३९ मतदारांपैकी ९०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. व्यापारी मतदारसंघात ९१८ पैकी ८५४ मतदारांनी तर हमाल मापाडी मतदारसंघात ५१५ पैकी ४९९ मतदारांनी मतदान केले. एकूण ९६.३५ टक्के मतदान झाले.
माजी मंत्री सुरेश वरपुडकर, खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील यांचे पॅनल तर माजी सभापती विजय जामकर, आनंद भरोसे, कल्याणराव रेंगे, स्वराजसिंह परिहार या दोन पॅनलमधील चुरशीची निवडणूक ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...