आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेअरमनपदावरून वाद पेटला; नाराज समर्थकांची दगडफेक, 30 जणांवर गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- बहुचर्चित संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाची निवडणूक गाजली. मंगळवारी चेअरमनपदी भाजपचे तुषार शिसाेदे तर व्हाइस चेअरमनपदी भास्कर राऊत यांची निवड झाल्याचे जाहीर झाले. यानंतर नाराज अप्पासाहेब पाटलांच्या समर्थकांनी कारखान्यावर जाेरदार दगडफेक केली.
कार्यकर्ते इतके संतप्त हाेते की चक्क पाेलिसांच्या गाडीच्या काचाही त्यांनी फाेडल्या. यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पाेलिस संरक्षणात कारखान्याबाहेर पडावे लागले. याप्रसंगी शिसाेदे, घायाळ व माजी अामदार वाघचाैरे आणि अप्पासाहेब पाटील यांचे समर्थक अामने-सामने अाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी २५ ते ३० जणांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद केले आहेत.
आधी थकीत पगार द्या, नंतरच चेअरमनची निवड करा : दरम्यान, हा घाेळ सुरू असतानाच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनीही यात उडी घेतली. अाधी अामचा थकीत पगार द्या; नंतरच चेअरमन व व्हाइस चेअरमनची निवड करा, अशा घाेषणा दिल्या. अप्पासाहेब पाटील यांची चेअरमनपदी निवड न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावत शिसाेदे, वाघचाैरे, घायाळ यांच्या विराेधात तब्बल दाेन तास जाेरदार घाेषणाबाजी केली.

घाेषणाबाजी अन् दगडफेक : ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात अप्पासाहेब पाटील यांना चेअरमनपदापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे पाटील समर्थकांमध्ये सकाळपासूनच या निवडीवरून नाराजीचा सूर उमटत होता. परिवर्तन पॅनलचे तुषार शिसोदे, संजय वाघचौरे, सचिन घायाळ वाहनातून मतदानासाठी कारखान्याकडे पोहोचले. त्या वेळीच शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी या वेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा अाराेप काहींनी केला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कारखान्याच्या परिसरामध्ये चार तास होते तणावाचे वातावरण..
अप्पासाहेब पाटील यांचा दावा खोटा व इतर बाबी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...