आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत २० कोटींच्या जुन्या नोटा हातोहात बदलल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाने सावकार व व्यापाऱ्यांची झोप उडाली, परंतु पालिका निवडणुकीच्या नामी संधीचा फायदा घेत सावकार व व्यापाऱ्यांनी उमेदवाराला सहानुभूती दाखवत आपल्याकडील हजार व पाचशेच्या नोटा उसन्या किंवा व्याजाने दिल्या व उमेदवारांनी त्या नोटा मतदारांना दिल्या व मतदारांनी त्या नोटा बदलून नव्या नोटा घेतल्या. एकंदरीत २० कोटींच्या जुन्या नोटा हातोहात बदलल्या गेल्यामुळे आर्थिक भूकंपाचा विषय चर्चिला जात आहे.

सावकार, व्यापारी यांच्याजवळील मोठ्या रकमेच्या पाचशे व एक हजारच्या नोटा बदलाव्या कशा, असा प्रश्न व्यापारी व सावकारांसमोर पडला होता. त्यातच स्थानिक पातळीवर महत्त्वाची समजली जाणारी नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आणि या संधीचा फायदा व्यापारी व सावकारांनी बरोबर घेतला.
या निवडणुकीत उमेदवारांना पैसे वाटल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सावकार व व्यापारी यांनी उमेदवारांना सहानुभूती दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली व आपल्याकडील या नोटा हातोहात संपवल्या.
उमेदवारांनीही एका मतासाठी दोन ते तीन हजार रुपये याप्रमाणे या नोटांचे सर्रास वाटप केले. एकंदरीत या निवडणुकीत २० कोटींच्यावर उलाढाल झाली पण यामध्ये व्यापारी, सावकार, उमेदवार व मतदार सर्वच जण खुश झाले. निवडणुकीतील हादऱ्यापेक्षा आर्थिक भूकंपाचीच चर्चा जास्तच रंगत आहे.

पळवाटा
दर वेळेसच्या निवडणुकीत घोडेबाजार चांगलाच तेजीत असतो. यंदा मात्र नोटाबंदीमुळे याला बऱ्यापैकी लगाम बसला. असे असले तरी काही महाभागांनी यातून पळवाटा शोधल्या. त्यात ते यशस्वीही झाले. याची परिसरात जोरदार चर्चा होती.
एका विजयी उमेदवाराने चक्क प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराकडेच खंत व्यक्त केली. निवडणुकीत ईर्षेला पेटलेल्या उमेदवारांनी विजयासाठी मतदारांना अगोदरच ठरावीक रक्कम दिली. तेवढीच रक्कम प्रतिस्पर्धी उमेदवारांनी दिल्यानंतर पराभवाच्या भीतीपोटी ऐनवेळी रक्कम वाढवून देऊन मतदारांना प्रलोभन दाखवणारा उमेदवार विजयी झाला खरा; पण त्याने निकालानंतर थेट पराभूत उमेदवारांची भेट घेऊन झालेला खर्च पाच वर्षांतही कमावता येणार नसल्याची खंत व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...