आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Shortcircut News In Marathi, Mazalgaon, Divya Marathi

वीज तारा तुटल्याने मुलाचा मृत्यू; दुचाकीही भस्मसात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव/हिंगोली - माजलगाव शहरातील शिवाजी चौकात विजेच्या 11 केव्ही खांबावरील वीजपुरवठा सुरू असलेल्या तीनपैकी एक तार तुटून दुचाकीवर पडली. ही तार कोसळताक्षणी दुचाकीने पेट घेतला. दोन्ही टायर, मशीन, वायरिंग जळून खाक झाले. तार तुटल्यानंतरही दहा मिनिटे वीजप्रवाह सुरूच होता. या चौकात सुमारे 40 जण होते. हातगाडेचालक, भाजीपाला विक्रेते सुदैवाने बचावले. दरम्यान, प्रसंगावधान दाखवून अशोक आळणे, शिवमूर्ती कुंभार, अमोल डाके, अ‍ॅड. दीपक ढाकणे, नगरसेवक राम जगताप यांनी लाकडाच्या साहाय्याने दुचाकीवरील तार बाजूला केली. त्यानंतर पाण्याने आग आटोक्यात आणली. एवढा गंभीर प्रकार होऊनही वीज कंपनीचा एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. यामुळे संतप्त जमावाने थेट वीज कंपनीच्या कार्यालयावर धडक मारली.

खांबावरील तारा जीर्ण
माजलगाव शहरातून वीज वितरण कपंनीची 11 केव्ही वाहिनी गेलेली आहे. मागील 50 वर्षांपासून जुन्या तारा बदलण्यात आल्या नाहीत. बिघाड झाल्यास तात्पुरती दुरुस्ती केली जाते. त्यामुळे तारा जीर्ण झालेल्या आहेत. त्या बदलण्याची मागणी अनेकदा करण्यात येऊनही वीज कंपनीच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले.

दोघांना घेराव घातला
कार्यालयात गेलेल्या शिवसैनिकांनी उपअभियंता लक्ष्मण वारकरी व कनिष्ठ अभियंता जी.आर.चाटे यांना तासभर घेराव घातला. अधिका-यांना धारेवर धरल्याने संपूर्ण जुन्या तारा तातडीने बदलण्यात येतील, दुचाकीचे नुकसान भरून देऊ, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी घेराव मागे घेतला.

पुढे वाचा ....हिंगोलीत मुलाचा बळी