आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचे अडीच लाखांचे वीज बिल थकीत, तरी महावितरण सुस्त, वीजपुरवठा सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी महावितरणचे तब्बल २ लाख ५९ हजार १८० रुपये थकवले आहे. त्यांनी साडेचार महिन्यांपासून वीज बिल भरले नाही. इतकी मोठी थकबाकी असतानाही महावितरणने  कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केलेला नाही. दानवे यांचे भोकरदनमध्ये घर आहे. या घराचे  साडेचार महिन्यांपासून वीज बिल भरलेले नाही. महावितरणने ७ ऑगस्ट रोजी वीज बिल पाठवले आहे. त्यात थकबाकीचा उल्लेख आहे. दानवंेंनी २२ मार्च २०१७ रोजी वीज बिल भरले होते. त्यानंतर त्यांनी बिल भरलेले नाही तर दुसरीकडे महावितरणने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. खासदार दानवेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. 

बिल भरून घेणार
खासदार रावसाहेब दानवे यांचे थकीत बिल भरून घेण्यासंदर्भात भोकरदनच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उद्याच हे बिल भरून घेतले जाईल. त्यांच्याकडे बिल थकीत का ठेवले यासंदर्भातही महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना विचारणा केली.  
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरण,औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...