आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजनिर्मिती केंद्र बद पडण्‍याच्‍या मार्गावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - फक्त दोन दिवस पुरेल एवढा कोळसा आणि दीड महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्यामुळे वीजनिर्मिती केंद्र कधीही बंद पडण्याची शक्यता आहे. राज्यात चार हजार मेगावॅट विजेची तूट असताना हे केंद्र बंद पडल्यास पुन्हा 700 मेगावॅटची तूट निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील पाच संचांची एकूण वीजनिर्मिती क्षमता एक हजार एकशे तीस मेगावॅट आहे. या वर्षी दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन बंदच आहे. त्यामुळे 210 मेगावॅट क्षमतेचे चार व पाच 250 मेगावॅट क्षमेचे सहा व सात यामधून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू आहे. चार संच चालवण्यासाठी दररोज 70 हजार क्युबिक मीटर पाणी व 14 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. जुन्या संचाजवळ सहा हजार मेट्रिक टन आणि नवीन संचाच्या परिसरात केवळ तीन हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर वीजनिर्मिती केंद्र सुरू होते.

वीजनिर्मिती केंद्र 24 तास चालवण्याइतका कोळसा आला आहे. कोळसा अपुरा असल्याने चारही संच कमी क्षमतेने चालवण्यात येत आहेत.आंध्र प्रदेशातून रविवारी पाच वाघिणींतून कोळसा आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी कोळसा कमी आला, तर वीजनिर्मिती ठप्प होण्याची भीती आहे. ऊर्जा विभाग हे संच बंद पडू नयेत, यासाठी जास्तीचा कोळसा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. या केंद्राला पाणी पुरवणार्‍या खडका बंधार्‍यात 4.60 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. या साठ्यावर 15 फेब्रुवारीपर्यंत वीजनिर्मिती केंद्र चालू शकते. मात्र, कोळसा टंचाईमुळे कोणत्याही क्षणी हे केंद्र बंद पडू शकते. असे झाल्यास ग्राहकांना पुन्हा वाढीव भारनियमनाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.