आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर वीजपुरवठा होणार खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - महावितरण कार्यालयाने मार्च एंडच्या नावाखाली वीज ग्राहकांची पिळवणूक सुरू केली असून ग्राहकांकडे 10 रुपये थकीत असतील तरीही वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता नीलेश नागरे यांनी दिली.

पैठण शहर व तालुका भारनियमनमुक्त करण्यासाठी वीजचोरी रोखणे, बिल भरणा वेळेवर होणे गरजेचे असून, त्यासाठी विशेष पथकाची स्थापना महावितरणने केली आहे. सध्या तालुक्यात वीज बिल वसुली जोरात सुरू आहे. यासाठी महावितरणने गावपातळीवरील घरगुती, उद्योगांकडील वीज बिल वसुलीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महावितरण कंपनी येत्या पंधरा दिवसांत एकूण चार कोटी रुपयांची वसुली करणार असून पंधरा दिवसांत तीन कोटी रुपयांची वीज बिल वसुली झाली आहे. यादरम्यान 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दहा जणांचे पथक
महावितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी दहा अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक तयार केले आहे. मुख्य अभियंता शंकर शिंदे, उपअभियंता अजिंक्य सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे विशेष पथक वीज बिल वसुलीसाठी महावितरणने तयार केले आहे.

कुठल्याही ग्राहकाकडे दहा रुपयांचे वीज बिल थकले, तरी त्याचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. ग्राहकांनी आपले संपूर्ण वीज बिल तत्काळ भरावे. नीलेश नागरे, उपविभागीय अभियंता