आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Production Centre Shut Down Due To Water Shortage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याअभावी परळीचे वीज निर्मिती केंद्र बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - पाण्याअभावी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक तीनपाठोपाठ पाचवा संच गुरुवारी रात्री बंद करण्यात आला. पाचही संच बंद पडल्याने पुरेसे पाणी उपलब्ध होईपर्यंत वीज निर्मिती केंद्रच बंद ठेवण्याचा निर्णय ऊर्जा खात्याने घेतला आहे.

जायकवाडी व माजलगाव धरणाचे पाणी या केंद्राला मिळत होते. पाचही संचांसाठी एक लाख क्युबिक लिटर पाणी लागते. यंदा दोन्ही धरणे कोरडी पडल्याने पाणी बंद झाले. मुदगल बंधा-या तील पाणी लोकप्रतिनिधींनी रोखले आहे.केंद्रातील 95 कर्मचा-यांच्या नियुक्त्या 6 महिन्यांसाठी इतरत्र केल्या आहेत. या काळात दुरुस्तीची कामे केली जातील, असे उपमुख्य अभियंता आर.बी. गोहणे यांनी सांगितले.

संच क्षमता कधी बंद
3 210 13 फेब्रुवारी 13
4 210 6 नोव्हेंबर 12
5 210 14 फेब्रुवारी 13
6 250 6 नोव्हेंबर 12
7 250 14 फेब्रुवारी

40 वर्षांत पहिल्यांदाच निर्मिती ठप्प
परळी, नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस चंद्रपूर, भुसावळ येथे थर्मल आहे. वीज निर्मिती क्षमतेत (1130 मेगावॅट) परळी दुसरे केंद्र आहे. 1972 पासून हे केंद्र कधीच ठप्प नव्हते. येथे 47 हजार मे. टन कोळसा शिल्लक आहे.