आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encounter Continues In Jammu Pampore 4 Jawans Martyred

J&K : तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्‍नान, 2 कॅप्‍टनसह 5 जवान शहीद, एन्‍काउंटर संपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहिमेत सहभागी जवान. - Divya Marathi
मोहिमेत सहभागी जवान.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोरमध्ये सरकारी इमारतीमध्ये दडलेल्या दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक तिसऱ्या दिवशी संपली. तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. रविवारी झालेल्या तुफान गोळीबारात चकमकीत कॅप्‍टन पवनकुमार आणि कॅ. तुषार महाजन यांच्‍यासह पाच जवान शहीद झाले. मृतांत नागरिकांचाही समावेश आहे.
#1. केव्‍हा आणि कसा झाला हल्‍ला ?
- शनिवारी सायंकाळी काही दहशतवाद्यांनी पंम्‍पोरकडून श्रीनगरकडे जात असलेल्‍या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर अचानक फायरिंग सुरू केली.
- त्‍यानंतर ते जवळच्‍याच एका शासकीय बिल्डिंगमध्‍ये घुसले.
- या इमारतीत असलेल्‍या 150 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्‍यात आले.
- मागील तीन दिवसांपासून याच इमारतीमधून हे दहशतवादी हल्‍ला करत आहेत.
#2. लष्‍कर कसे देत आहे उत्‍तर ?
- लेफ्टिनेंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले, ''आम्‍हाला अजिबात घाई नाही. जोपर्यंत सर्व दहशतवाद्यांचा खात्‍मा होत नाही तोपर्यंत आम्‍ही वेळ घेणार आहोत. आमचे स्पेशल यूनिट डोळ्यात तेल घालून आहे. बाहेर सीआरपीएफचेही पथक तैनात आहे.''
- ''आम्‍ही एका-एका खोलीचा तपास करत घेत आहोत.
- ''ही इमारत खूप मोठी आहे. दहशतवादी मुख्‍य ठिकाणी लपलेले आहेत. ''
- ''आम्‍ही योग्‍य पद्धतीने त्‍यांच्‍या हल्‍ल्‍याचा उत्‍तर देत आहोत. इमारतीत असलेल्‍या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे,'' अशी माहिती त्‍यांनी दिली.
- यापूर्वी पाकिस्‍तानी दहशतवाद्यांनी 2 जानेवारीला पठाणकोट हवाई दलाच्‍या तळावर हल्‍ला केला होता. त्‍यावेळी दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यासाठी 38 तास लागले होते.
#3. यांना आले वीरमरण
- कॅप्टन पवन कुमारः दहशतवाद्याचा निधड्या छातील मुकाबला करताना हे शनिवारी गंभीर जखमी झाले. रविवारी उपचारादरम्‍यान ते शहीद झाले. ते केवळ 23 वर्षांचे होते
- कॅप्टन तुषार महाजनः आर्मी पॅरा-कमांडो कॅप्टन तुषार महाजन रविवार चकमकीत हुतात्‍मा झाले.
- लान्‍स नायक ओम प्रकाश, कॉन्स्टेबल आर.के. रैना आणि हेड कॉन्स्टेबल भोला सिंह यांनाही वीर मरण आले.
- फायरिंगमध्‍ये एका सामान्‍य नागरिकाचाही मृत्‍यू झाला.
शहीद होण्‍यापूर्वी जवानाने म्‍हटले, मला आरक्षण नको की स्‍वातंत्र्य ?
- शहीद कॅप्टन पवन कुमार यांनी आपल्‍या फेसबुक पेजवर केलेल्‍या शेवटच्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटले, “ कुणाला आरक्षण पाहिजे तर कुणाला स्‍वातंत्र आम्‍हाला तर काहीच नको. फक्‍त आमची रजाई हवी.”
- शहीद कॅप्‍टन पवनकुमार हे हरियाणीतील जिंदचे रहिवासी असून, जाट होते. विशेष म्‍हणजे दिल्‍लीतील जेयूडी विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी आहेत.
100 कुटुंबाना सुरक्षित स्‍थळी हलवले
आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (ईडीआय) इमारतीत रविवारी दुपारी आग लागली होती. त्यामुळे परिसरातील 100 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
ऑपरेशनसाठी का लागतोय वेळ
इमारतीचा बराचसा भाग खुला असल्याने चढाईात अडथळे येऊ लागले आहेत. चकमक आणखी लांबू शकते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पॅरा स्पेशल फोर्सचे नेतृत्‍व करत होते पवनकुमार.... नागरिकांना काढले बुलेट प्रूफ गाडीतून सुरक्षित बाहेर.....मुलाच्या बलिदानाचा गर्व, पवनकुमारच्या वडिलांच्या भावना