आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याने घेतला मोकळा श्वास; नगरपालिकेची धडाकेबाज मोहीम सुरू, सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - शहर स्वच्छतेसाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत मोतीबाग ते अंबड चौफुलीदरम्यानचा रस्ता अतिक्रमण मुक्त केला आहे. दरम्यान उठविण्यात आलेल्यांना आठ दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आल्या होत्या यांच्यावर सोमवारी कारवाई करण्यात आली आहे.

शहर स्वच्छतेवर नगरपालिकेच्या वतीने मोठे पाऊल उचलण्यात आले असून अडचण ठरणारांवर कारवाई करणे सुरू केली आहे. यामध्ये 40 मायक्रॉन जाडीपेक्षा कमी प्लास्टिक वापरणे, कत्तल खान्यांमुळे वाढणारी घाण, रस्त्यांवरील वाढता पाणी पाऊचच्या पिशव्याची घाण या बाबींसंदर्भात पालिकेच्या वतीने तपासणी केली जात आहे. या अंतर्गत विनापरवाना पालिकेच्या जागेवर सुरू असलेली दुकाने, टप-या सोमवारी काढण्यात आल्या. यास सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली.

आज नूतन वसाहत परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. या ठिकाणी काही व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. सुधारणा झाली नसलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपद्रव पथकाच्या अधिका-यांनी सांगितले.

हे उपद्रव पथक
जवळपास तीस लहान मोठी दुकाने हटविण्यात आली असून त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या पथकात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक डी.टी.पाटील, उपद्रव पथक प्रमुख सॅमसन कसबे, भीमा लोंढे, गौतम हिवाळे, फकिरा आव्हाड, चंदकांत ससाणे आदींनी ही कारवाई केली आहे.

दिली होती नोटीस
सदरील चहाच्या टप-या, हॉटेल, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते यांच्याकडून विक्री केल्या जाणा-या वस्तंूमुळे कचरा निर्माण होत होता. तसेच दुकान अनधिकृतपणे सुरू होते. या संदर्भात उपद्रव पथकाने सर्व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

मोहीम सुरू राहणार
शहर स्वच्छता आणि अतिक्रमण काढण्याची मोहिम स्वच्छता समितीच्या बैठकीपासून सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे. पूर्ण शहर स्वच्छ असे पर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी.