आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईच्या धास्तीने व्यापार्‍यांनी अतिक्रमण हटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या वेरूळ येथील सोलापूर-धुळे महामार्गालगत असणारे अतिक्रमण हटवण्यास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. खुलताबाद पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व उपनिरीक्षक अप्पासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळी महामार्गावरील व्यावसायिकांची बैठक घेत दुसर्‍या दिवशी रस्त्याच्या दुतर्फा ५० फुटांपर्यंत अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, व्यावसायिकांनी विनंती करत ३३ फुटांपर्यंत अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शवली होती.

बुधवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी बैठक घेत वेरूळसह पर्यटनस्थळांवरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त दैनिकात प्रकाशित होताच व्यावसायिकांनी धास्ती घेत स्वत: अतिक्रमणे हटवली. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून उर्वरित अतिक्रमणे काढण्यास पोलिस प्रशासनातर्फे सुरुवात होणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस माजी सरपंच प्रकाश पाटील, रमेश ढिवर, हाजी अल्लाद्दीन शेठ, श्याम शेवाळे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...