आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्हा परिषदेत कोट्यवधींचा ‘ऊर्जा’ घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप नाडे यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- सत्ता परिवर्तनानंतर जिल्हा परिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा शनिवारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मागील काळात जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये करण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामांत अधिकाऱ्यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दिलीप नाडे यांनी केला. 
 
संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बाजूला करून या कामांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करीत ‘ऊर्जा’ कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी नाडे यांच्यासह अनेक सदस्यांनी लावून धरली. मात्र, या मागणीवर खुलासावजा निवेदन करताना ही कामे मागच्या काळात झाली असून त्यात आमचा कुठलाही संबंध नाही. अधिकारीही आमच्या जवळचे नाहीत. सभागृहाची एकमुखी मागणी असेल तर चौकशी जरूर करू असे सांगत सभापती प्रकाश देशमुख यांनीही यातील भ्रष्टाचाराची शक्यता वर्तवली. परंतु अशा चौकशा करीत बसण्यापेक्षा नव्याने काही चांगले करण्याचा प्रयत्न आपण सारे मिळून करूया, अशा शब्दांत सदस्यांना थंड करीत अधिकाऱ्यांचीच पाठराखण केली. एकूणच आजच्या सभेचे कामकाज पाहता सत्ताधारी व विरोधकांचे विकासाच्या प्रश्नावर चांगलेच ‘एकमत’ झाल्याचे दिसून आले.  
बातम्या आणखी आहेत...