आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई तुळजाभवानी मातेच्या महिलांनाच प्रवेश नाकारला, महंताचा प्रताप!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला सोडण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी तुळजाभवानी देवीच्या मुख्य महंतांनाच आडवल्याची घटना सोमवारी(दि. ४) पहाटे घडली. यामुळे मंदिर  उघडण्यास उशीर झाल्याने तुळजाभवानी मातेच्या चरणतीर्थ पूजेस अर्धा तास विलंब झाला. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी स्थानिकांना थेट सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  दुसरीकडे या गोंधळामूळे शेकडो बोगस ओळखपत्रांचा विषयही चव्हाट्यावर आला असून मंदिर संस्थान याप्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे महंत तुकोजी बुवा प्रक्षाळ पूजेसाठी  तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख दरवाजे उघडण्यासाठी आले असता स्थानिक महिलांनी अपंग गेटजवळ त्यांना अडविले. यावेळी  महिलांनी चरणतीर्थ पूजेसाठी सोडण्याची मागणी करीत महंतांना मंदिर उघडण्यास मज्जाव केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू असल्याने तणावही निर्माण झाला होता. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी फोनवरून याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यावेळी केवळ अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या महिलांना सोडण्याची परवानगी देण्यात आली.   
    
गाभाऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्यांचे  व्हिडिओ चित्रीकरण  : तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील घडामोडीवर नजर ठेवण्यात येत असून सकाळच्या चरणतीर्थ पूजेपासून ते सायंकाळी मंदिर बंद करतानाच्या प्रक्षाळ पुजेपर्यंतच्या प्रत्येक धार्मिक विधीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून  हा प्रकार सुरू असून यासाठी मंदिर संस्थानने एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. याद्वारे तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनाकारण ये-जा करणाऱ्या पुजारी सेवेकरी तसेच कर्मचाऱ्यांचीही नोंद घेतली जात असल्याचे कळते.

शेकडो बोगस ओळखपत्रे  
दरम्यान मंदिरात चरणतीर्थ पूजेसाठी ७ महिला व २० पुरुष  अशा  केवळ २७ जणांना अधिकृत ओळखपत्र आहे. मात्र, जवळपास २०० वर अनधिकृत ओळखपत्र असल्याचे बोलले जात अाहे.  यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात हे ओळखपत्र देण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...