आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Event Of Inaugaration, I Want See MLA Work Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त उद्घाटनाचे, आमदारांचे काम पाहाण्‍यासाठी आलो आहे - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन (औरंगाबाद ) - मी पैठण तालुक्याचा दौरा करावा, असे वाघचौरेंचे म्हणणे होते. त्यामुळेच मी आज इकडे आलो. निमित्त उद्घाटनाचे असले तरीही आमदारांनी काय काम केले हे पाहून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. भविष्यात ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.


शुक्रवारी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. या आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार संजय वाघचौरे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, केशवराव औताडे, सुधाकर सोनवणे सीईओ सुखदेव बनकर, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अंजली देशपांडे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, वाघचौरेंनी जिल्ह्याला सिमेंट बंधा-यासाठी मिळालेल्या 33 कोटींच्या निधीतून पैठणसाठी सात कोटी 60 लाखांचा निधी आणला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ब्रह्मगव्हाण येथील उपसा जलसिंचन योजनेसाठी वाढीव निधी देऊ आणि पैठण येथील संतपीठाचे कामही त्वरित सुरू करू, असे ठोस आश्वासनही त्यांनी दिले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी अजित पवार यांनी केले.


वाघचौरेंची मागणी
राष्‍ट्रीय पेयजल योजनेस मंजुरी, निधी द्यावा, ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी तसेच ड्रेनेजलाइन, अंतर्गत रस्त्यांसाठी 2 कोटींचा निधी द्यावा. रमजान सुरू झाल्यामुळे भारनियमन बंद करावे, अशी मागणी आमदार संजय वाघचौरे यांनी अजित पवारांकडे निवेदनाद्वारे केली. त्यावर आधी बिल भरा मग वीज देतो, असे मार्मिक उत्तर पवारांनी दिले. ब्रह्मगव्हाण लिफ्ट एरिगेशनसाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.