आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- आंबेडकरी विचारांना कृतीची जोड देऊन दलितोद्धारासाठी आयुष्य वेचलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार त्र्यंबक मुकुंदराव कांबळे (56) यांचे शनिवारी पहाटे येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदाबाई, मुलगा कनिष्क, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

चार वर्षांपासून ते आजारी होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने प्रकृती गंभीर बनली होती. सिंगापूर, मुंबई येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. तीन महिन्यांपासून लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गायरानधारकांना हक्काची घरे मिळावीत, त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. हे करीत असताना दलित व सवर्णांतील वाद मिटवण्यासाठी समन्वयाचा सेतू बांधण्याचे प्रयत्न त्यांनी केले.