आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अंकुशराव टोपे (७४) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी १० वाजता अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

टोपे यांना ७ मार्च रोजी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी १४ मार्च रोजी त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती सुधारत असताना रविवारी पहाटे अचानक त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, मुलगी, भाऊ, पुतणे, नातू, सुना असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव चेन्नईहून विमानाने औरंगाबादला आणण्यात आले.