आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारकी भोगलेल्यांना आता काँग्रेसचा विसर पडत चाललाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- काँग्रेसकडून खासदारकी, आमदारकी अशी सत्तेची पदे भोगलेल्या माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील अशा महान व्यक्तीला वाढत्या वयोमनामुळे आता काँग्रेस पक्षाचा विसर पडत चालला आहे.

सध्या तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्ष संपविण्याचे काम सुरू केले असल्याचा खळबळजनक आरोप औरंगाबाद -जालना स्थानीक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांनी सोमवारी वैजापुरात बोलताना केला.काँग्रेस संपविण्यासाठी निघालेल्या बाबांमुळे काँग्रेस पक्ष संपणार नसून काँग्रेस पक्षाचे साम्राज्य टिकविण्याचे काम आता नवी पिढी जोमाने करील, असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.

बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आघाडी प्रणीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभात पहिल्यांदा माजी खासदार पाटील यांच्यावर टीकेचा निशाणा आमदार झांबड यांनी बोलताना साधला.

वैजापूर येथील सूरज लॉन्स मंगल कार्यालयात पार पडलेल्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला आमदार भाऊसाहेब पा. चिकटगावकर, माजी आमदार नितीन पाटील, माजी तालुकाध्यक्ष भगवान तांबे, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मनसेचे जिल्हाध्यक्ष कल्याण दंागोडे, जि.प. उपाध्यक्ष दिनकर पवार, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सारंगधर डिके, सुभाष तांबे, अभय पा. चिकटगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारांची उपस्थिती
या प्रचार शुभारंभाला बंटी मगर, सागर गायकवाड, प्रवीण तांबे,भरत साठे, अमोल बावचे, योगेश साठे,बाळा सुतवणे,सतीष शिंदे, महेश भालेराव आदींसह सोसायटी, ग्रामपंचायत आदी मतदारसंघाचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबांनी १८ गावांतील शेतकरी देशोधडीस लावले
प्रचारात आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी कुठे टोपलीभर विकासाचे काम केले का, असे बोलणाऱ्या बाबांनी गेल्या वर्षात लाडगाव येथे पार पडलेल्या गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सराला बेटासह गंगथडीतील सर्व रस्ते दुरुस्तीचे काम केले याची माहिती सराला बेटाचे मंहत रामगिरी महाराजांकडून घ्यावी असे सुनावले. आमदारकी, सभापती होण्याची भूमिका डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी एक झाली आहे. आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलमधील सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप आदी उपस्थित होते.

पाटलांची विनंती...
सेनेच्या शिवशाही पॅनलच्या उमेदवारासाठी जिल्हा बँकेतील कर्मचारी एका संचालकाच्या दबावाखाली मतदारांना गळ घालत आहे. यावर नामी उपाय करण्यासाठी नेत्यांनी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांना कर्मचाऱ्याचे कान टोचले.
बातम्या आणखी आहेत...