आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् १८ तलाठ्यांनी अर्ध्या तासातच पेपर सोडवून दिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजाेगाई- प्रशासकीय पातळीवर अनेक मजेदार अाणि सर्वसामान्यांना चर्चेचे खाद्य पुरवणारे किस्से घडतात. ‘एेकावे ते नवल’ या धाटणीत बसणारा एक असाच किस्सा बुधवारी अंबाजाेगाईत घडला. त्याचे झाले असे की, महसूल विभागाकडून तलाठ्यांच्या वेतनवाढीसाठीची परीक्षा सध्या सुरू अाहे.

या परीक्षेदरम्यान एका पर्यवेक्षक महिलेने काही काॅपीबहाद्दरांना डाेळे वटारून पाहताच त्यांनी चक्क पेपर अर्ध्या तासातच साेडवून दिल्याचा प्रकार घडला. यात अाता मजेदार बाब अशी की, १८ परीक्षार्थींनी पर्यवेक्षक महिलेने अडथळा निर्माण केल्याचा अाराेप केला, महिला पर्यवेक्षकाने काॅपी करू दिल्यामुळे परीक्षार्थींनी पेपर अर्ध्या तासातच साेडवल्याचा अहवालच परीक्षा प्रमुखांकडे दिला. महसूल विभागामधील तलाठी नाेकरीत वेतनवाढीसाठी दरवर्षी महसूल विभागात परीक्षा घेतली जाते. १८ ते २० नाेव्हेंबरदरम्यान अंबाजाेगाईत परीक्षा हाेत अाहे. यात केज अंबाजाेगाई येथील २३ तलाठी बसले. ही परीक्षा मुकुंदराज विद्यालयामध्ये सुरू अाहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा कय आहे प्रकार...