आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील नाट्यसंमेलनात मराठवाड्यातील कलाकारांचीच अनुपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - ९७ व्या नाट्यसंमेलनाचा मान मराठवाड्याला मिळाला. त्यामुळे मराठवाड्यातील कलावंत या सोहळ्याला उपस्थित राहती अशी सर्वांनाच अपेक्षा होती. तसे झाले असते तर मराठवाड्यातील आणि मुख्यतः मराठवाड्याच्या ग्रामीण भागात जे तरुण या क्षेत्रात येण्याची स्वप्ने बाळगून आहेत किंवा त्या दिशेने धडपड करत आहेत त्यांना मोठी उर्जा या कलाकरांना पाहून मिळाली असती. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी वगळता मराठवाड्यातून जाऊन या क्षत्रात नाव केलेल्या कलाकारांची सगळे वाटच पाहत राहिले. 

कॉमेडीचा सुपरस्टार असलेल्या मकरंद अनासपुरे यांची संमेलनात सर्व आवर्जुन पाहत होते. विशेषतः ग्रामीण भागात त्यांची क्रेझ असल्याने रसिकही त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी भेटण्यासाठी उत्सुक होते. पण त्यांच्या अनुपस्थितीने रसिक प्रेक्षकांची निराशा झाली असावी. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र उन्हाळा असल्याने सध्या नाम फाऊंडेशनच्या कामामध्ये ते व्यस्त असण्याची शक्यता त्यांच्या काही सहकाऱ्यांनी व्यक्त केली. 
मराठवाड्याचा आणखी एक सुपुत्र म्हणजे मंगेश देसाई. नाट्य संमेलनाच्या तारखा बदलल्या आणि नव्या तारखा आधीच शूटसाठी दिल्या होत्या, त्यामुळे उस्मानाबादेत येता आले नाही असे मंगेश देसाईंनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री प्रयोगाद्वारे महाराष्ट्राला खळखळून हसवणारा संदीप पाठकही मराठवाड्याचाच. अगदी उस्मानाबादच्या जवळ असलेल्या माजलगावचा. पण संदीपचे इतर ठिकाणी शूट सुरू असल्याने त्याला यायला जमले नाही. यासंदर्भात आम्ही फोन केल्यानंतर आपण इतर काही कार्यक्रम रद्द करून किमान समारोपाला येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. मात्र रविवारी दुपारपर्यंत तोही पोहचलेला नव्हता.

मराठवाड्यातील कलाकारांचे सांगायचे चंद्रकांत कुलकर्णी हे नाट्य संमेलनाला उद्घाटनाला उपस्थित होते. कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबादचा योगेश शिरसाठ शनिवारी रात्री कार्यक्रमाला आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. मराठवाड्याच्या कलाकारांच्या यादीतील इतर कोणी मात्र येथे आढळले नाही. मराठवाड्याचे सुपूत्र म्हणून जर हे मराठवाड्यातील कलाकार ठरवून याठिकाणी आले असते तर नक्कीच मराठवाड्यातील नवोदीत कलावंतांना आणि नाट्य चळवळीला नक्कीच मोठा फायदा झाला असता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...