आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमिक शाळेतील सेवक संच दुरुस्त्या होणार; अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या सोबत शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करताना आमदार दत्त्तात्रय सावंत, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे - Divya Marathi
शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या सोबत शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करताना आमदार दत्त्तात्रय सावंत, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे
खर्डी (उस्मानाबाद) - विद्यार्थी संख्येवर शिक्षक संख्या निश्चित करण्याच्या धोरणामुळे अनेक माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झालेले होते. परंतु २८ ऑगष्ट २०१५ आणि ८ जानेवारी २०१६ च्या शासन आदेशाप्रमाणे सेवक संच दुरुस्त्या होणार असल्याने माध्यमिक शाळेतील अनेक अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती पुणे विभाग शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे.

विविध विभागाचे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयुक्त कार्यालय पुणे येथे संपन्न झाली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली. शिक्षण आयुक्त धीरज कुमार, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आमदार, डॉ.सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, कृती समितीचे कोषाध्यक्ष कल्याण बर्डे, ई.गव्हर्नर तथा शिक्षण संचालक बालभारती सुनील मगर, शिक्षण सह संचालक राजेंद्र गोंधने यांची यावेळी उपस्थिती होती.  
 
शासनाच्या आदेशानुसार सेवकसंच दुरुस्त करून इयत्ता ९ वी ते १० वीच्या वर्गासाठी कमीत कमी ३ शिक्षक आणि ८ वी ते १० वीच्या शाळेसाठी मुख्याध्यापकासह ५ शिक्षक मंजूर करावेत, अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केली. यावर शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी दिली लगेच संमती दिली. यामूळे आता अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निकाली निघणार आहे.

ऑनलाईन मुल्यांकन झालेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांची माहिती जून पर्यंत शासनाकडे सदर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्लान मधील सर्व पदे नॉनप्लान मध्ये समाविष्ठ झालेली आहेत. परंतु, इतर चार हेड मधील निधी खर्च करण्यासाठी १ ते २ महिन्याचा पगार त्यामधून कपात केला जाणार असल्याची माहिती आमदार सावंत यांनी दिली.
 
२० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांची नावे शालार्थमध्ये समाविष्ट होणार... 
राज्यातील १६२८ शाळा व २४५२ तुकड्या २० टक्के अनुदानास पात्र झालेल्या आहेत. त्यामधील शिक्षकांचे सप्टेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंतचे वेतन ऑफलाईन वेतन प्रणालीने करण्यात आले होते. परंतु मार्च २०१७ पासूनचे वेतन देण्यासाठी त्यांची माहिती ऑनलाईन होणे आवश्यक आहे. ऑनलाईन वेतनासाठी शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्माचा-यांची नावे समाविष्ट होणे आवश्यक आहे. ७ मे २०१७ पर्यंत कर्माचा-यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये सामाविष्ठ करण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आमदार सावंत यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...