आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-याला बँकेकडून मिळालेल्‍या बंडलामध्‍ये 34 बनावट नोटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- उमरी तालुक्यातील बोथी येथे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलिसांनी एका शेतकर्‍याच्या घरातून 500 रुपयांच्या 34 बनावट नोटा जप्त केल्या. हुसेन्ना राजन्ना नवोड (55) असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे. हुसेन्ना यांनी 22 मे रोजी उमरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून 50 हजारांचे पीक कर्ज काढले होते. बँकेने दिलेल्या बंडलातून या नोटा मिळाल्याचे हुसेन्ना यांनी पोलिसांना सांगितले.
उमरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मैराळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन्ना यांनी 31 मे रोजी सालगड्याची पत्नी निर्मला माधव करपे हिला 13500 रुपये दिले. ही रक्कम 500 च्या नोटांमध्ये देण्यात आली. निर्मलाने आंध्र प्रदेशात राहणार्‍या नणंदेकडून अडीच हजार रुपये उसने घेतले होते. ते परत देण्यासाठी ती आंध्रातील मलिंगा येथे गेली. नणंदेने 1 जून रोजी म्हैसा येथील बाजारात सामान खरेदी करताना या नोटा दिल्या तेव्हा दुकानदाराने त्या घेण्यास नकार दिला. त्या महिलेने नर्मदाबाईला अडीच हजार रुपये परत दिले. निर्मलाने सर्व नोटा खोट्या असाव्यात या शंकेने हुसेन्ना यांना पैसे परत दिले. त्या बदल्यात दुसर्‍या नोटा घेतल्याचीही चर्चा गावात पसरली.
हा प्रकार पोलिस निरीक्षक मैराळ यांना कळताच रविवारी सकाळी मैराळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हुसेन्ना यांच्या घरी जाऊन सर्व नोटा जप्त केल्या. हुसेन्ना यांच्याविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेपाळहून आल्या बनावट नोटा!
लातूर, परभणीत बनावट नोटा