आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी नापास मात्र भासवले BHMS, अडीच वर्षांपासून रुग्णांवर उपचार, पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील राजेराय टाकळी येथे एका  बोगस मुन्नाभाई बीएचएमएस डाॅक्टराचा खुलताबाद पोलिसांनी पर्दाफास केला आहे.  १२ वी नापास व बनावट डिग्रीवर रुग्णांच्या जीवाशी खेळणारा मुन्नाभाई डाॅक्टर हा पोलिसांच्या परिक्षेत फेल झाला असून मुन्नाभाई डाॅक्टराला पोलिसांनी गजाआड केले आहे. रफिक हबाब शेख असे अटक करण्यात आलेल्या मुन्नाभाई डाॅक्टरचे नाव आहे. पोलासांच्या कार्यवाहीने तालुक्यातील  बोगस डाॅक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.  
 
 रफिक हबीब शेख वय ३७ वर्ष रा. बाबरा ता. फुलंब्री हल्ली मुक्काम राजेराय टाकळी हा व्यक्ती १२ वी नापास असून तो गेल्या तीनवर्षा पासुन राजेराय टाकळी येथे भाड्याच्या गाळ्यात आपले हाॅस्पिटल चालवत होता.   खुलताबाद पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांना  रफिक शेख हा बोगस डाॅक्टर आहे व तो  उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लुबाडणूक करत असल्याची  माहीती मिळाली होती. त्या नुसार पो.निरीक्षक हरीश खेडकर, पोलीस हवालदार प्रकाश मोहिते, निळखंट देवरे, पोलिस शिपाई विष्णु चव्हाण, साबळे यांनी राजेराय टाकळी गाठले व बाबरकर नावाच्या बोगस डाॅक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला.  

अधिक माहिती जाणून घेतली असता डाॅक्टर मुन्नाभाई बोगस डाॅक्टर अाढळुन आला. पोलिसांच्या माहिती नुसार सदरील तोत्या डाॅक्टरकडे बीएचएमएस तसेच बीएएमएस बोगस प्रमाणपत्र अाढळुन आले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता रफिक शेखने ८ हजार रूपय देउन वैद्यकीय पदवीचे  बोगस प्रमाणपत्र बनवले असल्याचे निष्पन्न झाले. बोगस डाॅक्टर रफिक शेखला तत्काळ ताब्यात घेतले व रुग्णालयातील साहित्य, रुग्ण तपासणी टेबल, आतिल खोलीतील तीन बेड  दवाखान्यातील सर्व औषधे,साधने जप्त करण्यात आली. तालुका वैद्यकिय अधिकारी बी.आर.पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रफिख शेख विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.  

निमोनियाचे स्पेलिंग लिहिले चुकीचे   
बोगस डॉक्टर रफिक शेख हा पोलिसांच्या परीक्षेत फेल झाला.  पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस डाॅक्टराची माहिती पत्रकारांना दिली. तसेच परिषदेत शेखला खेडकर यांनी काही इंग्रजीतील अवघड शब्दांचे स्पेलिंग लिहिण्यास सांगितले. त्याने ते इंग्रजीत लिहिले परंतु तीनपैकी एकाही शब्दांचे स्पेलिंग बरोबर तो करू शकला नाही. त्याने स्वत:च्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड छापून त्यावर बीएचएमएस व बीएएमएस अशा पदव्या टाकल्या होत्या. कोणतीही पदवी नसताना बाबरेकर नावाने तो सर्रासपणे रुग्णांवर उपचार करत होता.
 
विभागाकडून होती कारवाई अपेक्षित
बोगस डाॅक्टर ला पकडण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून अपेक्षित असताना ही कारवाई पोलिसांनी केली. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी औपचारिकता म्हणून केवळ डॉक्टरविरोधात तक्रार दिली. तालुक्यातील टाकळी राजेराय येथे बोगस डॉक्टर शेख हा अडीच वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत होता. याचा मागमूसही तालुका आरोग्य विभागाला नसल्याने अाश्चर्य व्यक्त होत  आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून कारवाई होणे गरजेचे आहे.
बातम्या आणखी आहेत...